२००७ सालातील हि गोष्ट, एका रशियन चानल वर एक छोटीसी फिल्म दाखवली गेली होती. हि फिल्म नासाच्या अंतराळविरांच्या संदर्भात होती. या मध्ये असे दाखवले गेले कि या अंतराळवीरांचा सामना काही परग्रहातील सभ्यातेशी झाला. रशियन युएफओलोजीस्ट व्लादिमीर अजाजा आणि खगोलशास्रज्ञ येवजेनी अर्सुखिन यांनी सांगितले कि १९६९ ते १९७२ च्या दरम्यान जे काही चंद्र अभियान झाले त्यात असे आढळून आले कि चंद्रावर एलिअन बेस आहे. चंद्रावर पृथ्वीबाहेरील काही बुद्धिवान पर्ग्राहावासियानचे तळ आहे.
अपोलो अभियान झाले तेव्हापासून ते आतापर्यंत ह्या विषयी बर्याच गोष्टी कानावर आल्या. असे म्हटले जाते कि चंद्राची दुसरी बाजू, जी पृथ्वीवरून दिसत नाही तेथे परग्रह वासियांचा तळ आहे. बर्याच वेळा असा प्रश्न उपस्तीत केला गेला, कि चंद्रावर झालेल्या मोहिमेनंतर आजपर्यंत तेथे एखादा मनुष्य तळ का नाही उभारला गेला किवा आजपर्यंत तसले प्रयत्न का नाही केले गेले?
अमेरिकेने २०२० पर्यंत चंद्रावर पुन्हा मोहिमेचा दावा केला आहे परंतु असे असुनही नासाने या बाबत अजून कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.
चंद्रावर असणाऱ्या परग्रहवासियाबद्दल जास्त माहिती पुरवनारे दुसरे तिसरे कुणी नसून चंद्रावर गेलेले अंतराळवीरच आहेत. खासकरून नील आर्मस्ट्रांग त्यांच्या म्हणण्यानुसार चंद्रावर एलिअन बेस आहे आणि त्यांनी मनुष्यांना चंद्रापासून दूर राहण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. नौदलाचे इंटेलीजेंसी ऑफिसर मिल्टन कूपर यांच्या मतानुसार तेथे एलिअन बेस तर आहेच आणि अमेरिकी नौदलात त्याला "लुना" या नावाने ओळखतात. चंद्रावर एलिअनची मोठी मोठी याने आहेत आणि ते छोट्या चकतीप्रमाणे असणाऱ्या तबकाडीमधून पृथ्वी भ्रमण करण्यासाठी कधी कधी येत असतात.
नील आर्मस्ट्रांग आणि एडविन बज एल्डरिन यांनी २१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरण्याच्या पहीले उडती तबकडी बघितली. या दिवशी त्यांनी चंद्राच्या अंधारलेल्या भागात चमकणारा प्रकाश पहिला असे म्हटले होते. हि गोष्ट या घटनेच्या दूरदर्शन प्रसारणात ऐकण्यात आली. मिशन कंट्रोल ने या बाबत आणखी माहिती पुरवन्यास सांगितले परंतु या नंतरचा जो काही संवाद होता तो स्पष्ट एकू आला नाही. नासाचा एक पूर्व कर्मचारी ऑटो बाइंडर ने नासाचा संवाद आपल्या VHF रिसीविंग डिवाइस मधे रिकॉर्ड केला त्यामधे नसाने विचारले होते "तिथे काय आहे?" अपोलो वरुण उत्तर आले "These babies are huge,sir ! enormous! oh,my god! you don't belive it! I am telling you there are other spacecrafts out there, lined up far side of creter edge! They are on the moon, watching us ( या आकृत्या विशाल, फारच विशाल आहेत, श्रीमान! तुम्हाला विश्वास होणार नाही! पण येथे क्रेटर जवळ एका सरल रांगेत दूसरी अंतरिक्ष याने आहेत! त्यांची आमच्यावर नजर आहे )
काही लोकांचे असे म्हनने आहे की नासाला चंद्रावर असणार्या एलियन आणि त्यांच्या यानाबद्दल अगोदर पासून माहित होते परंतु सारे प्रसारण गोपनीय ठेवण्यात आले. अंतराळवीरांना याबाबत काही बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच या मोहिमेचे कागद्पत्रक , विडिओ क्लिपिंग इत्यादि चोरीला गेले अशी घोषणा केली गेली. १९७९ मधे मोरिस चेटलेन हे नासाच्या communication विभागाचे प्रमुख होते त्यानी या गोष्टीला दुजोरा दिला की नील आर्मस्ट्रोंग यानी चंद्रावर दोन तबकडया बघितल्याची सूचना दिली होती. चैटलेन यानी असेही सांगितले की नासाला या बाबत सर्व माहिती होते परंतु आजपर्यंत याबाबत कुनाल काहीही सांगन्यात आले नाही.
नील आर्मस्ट्रोंग यानी तबकडया बघितल्याची सूचना दिली होती पण, ती सूचना नासाने सेंसर म्हणून बाद केली. वैज्ञानिक डॉ. अलेक्सेंद्र कजानतसेव यांच्या मते बज्ज एल्डरिन यानी चंद्रावर उतरलेल्या मोड्यूल मधून त्या यानांचे रंगित फोटो काढले. त्यानी नील आर्मस्ट्रोंग चंद्रावर पाय ठेवेपर्यंत यानांची रेकॉर्डिंग चालू ठेवली होती. डॉ. अजाज यांचा दावा आहे की अंतराळविरांच्या चंद्रावर पोहोचन्याच्या नंतर काही मिनिटातच परग्रहवासी आपल्या यानातुन फरार झाले.मॉरिस चैटलेन यांनी या गोष्टीला हि दुजोरा दिला कि बर्याच वेळा अपोलो ११ चे redio संदेश बाधित करण्यात आले जेणेकरून जगाला या सत्यापासून वंचित ठेवण्यात यावे.
चैटलेन असेही सांगतात कि सर्व अपोलो आणि जेमिनी विमानांचा एका विशिष्ट अंतरापर्यंत पाठलाग केला गेला, याची सूचना अंतराळवीरांनी दिली होती पण त्यांना या संदर्भात चूप राहण्याचे आदेश दिले गेले.
काही वर्षापूर्वी नील आर्मस्ट्रोंग बरोबर एका मुलाखतीत नील सांगत होते :- सर्व अविश्वसनीय होते.आम्हाला याबद्दल कदाचित माहिती होते, आणि एलिअनस कडून याबाबत चेतावणी देखील मिळाली होती. त्यामुळे तिथे स्पेस स्टेशन किंवा मून सिटी बनवता आली नाही. नील यांनी असेही सांगितले कि त्यांचे यान आपल्या यानापेक्षा कितीतरी मोठे आणि टेक्नोलोजी च्या बाबतीत आपल्या पेक्षा कितीतरी श्रेष्ट होते.
आर्मस्ट्रोंग यांनी सांगितले कि हि एक सत्य घटना आहे.याबाबत खोल वर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला पण, ते म्हणाले कि या बाबतीत सत्य लपवण्यात सी आय ए चा हात होता.
सत्य काहीही असो परंतु मानव जातीची एवढी मोठी मोहीम आणि तिचे दस्तावेज चोरट्यांकडून लंपास व्हावे हे मनाला न पटण्यासारखे आहे.
http://rahasya.romanch.blogspot.com/
मराठी संवाद- सुरज राणे

No comments:
Post a Comment