Powered By Blogger

Wednesday, December 8, 2010

कृष्णविवर म्हणजे काय ?

कृष्णविवाराची उत्पत्ति कशी होते हे जाणून  घेण्यासाठी सर्वप्रथम एक मोठ्या तार्‍याचा जीवनक्रम कसा असतो याची माहिती आपण घेवुयात.


प्रचंड प्रमाणात हायड्रोजन वायु स्वताच्याच गुरुत्वबलामुळे आतल्या बाजुस कोसळन्यास सुरवात होते तेव्हा एका तार्‍याची निर्मिती होते. जसजसा हळूहळू हा वायु  आंकुचन पावतो तसतसे त्यामधले अणु एकमेकावर आदळले जातात आणि त्यांची एकमेकांवर आदळण्याची  वारंवारता आणि गती वाढत जाते आणि उष्णता निर्माण होते. ही उष्णता प्रचंड असते त्यामुळे वायुचे  तापमान वाढते आणि एका ठराविक मर्यादेला अणु एकमेकावर आदळून परत न फिरता त्यांचे हेलियमच्या अणु मधे रूपांतर होते.
 या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते आणि त्यामुळे तारा चमकताना दिसतो. या सर्व प्रक्रियेत अजुन एक गोष्ट घडते ती म्हणजे जी काही अतिरिक्त उर्जा निर्माण होते ती तार्‍याला आत कोसळवणार्‍या गुरुत्व बलाला विरोध करते आणि तारा आत कोसळन्याचे थांबतो. जसे एखाद्या फुग्यामाधे आतील हवेचा दाब (जो फुग्याला आतून बाहेर फुगवन्याचा प्रयत्न करतो )  आणि त्याच्या रबरामुळे निर्माण झालेला बाहेरील दाब ( जो फुग्याला लहान करण्याचा प्रयत्न करतो ) यामधे संतुलन असते तसेच काहीसे इथे होते आणि तारा संतुलित अवस्थेत येतो.

या प्रमाने तारा दीर्घ कालपर्यंत संतुलित अवस्थेत  राहतो. जेव्हा तार्‍यातिल हायड्रोजन संपत येतो तेव्हा हायड्रोजन चे हेलियम मधे रूपांतर होण्याचे प्रमाण कमी होते आणि तार्‍याला संतुलित राहण्यासाठी जी उर्जा आवश्यक असते ती अपुरी पडू लागते. जेव्हा हायड्रोजन पूर्ण संपतो तेव्हा ही उर्जा निर्माण होत नाही,तारा थंड होऊ लागतो आणि तार्‍याला आत खेचानारे गुरुत्वबल प्रभावी होऊ लागते. तारा जसाजसा छोटा होत जातो तसतसे त्याच्या पृष्टभागाचे गुरुत्वबल वाढत जाते आणि  एका निश्चित त्रिजेला ते इतके प्रचंड होते की तार्‍याचा प्रकाश सुध्धा त्यातून बाहेर पड़ने अशक्य होते. इतकेच नव्हे तर या तार्‍या जवळून
जाणारे प्रकाश किरण सुध्धा तार्‍याच्या गुरुत्व बलामुळे आत खेचले जातात.


सापेक्षतवादाच्या सिध्धांतानुसार कोणतीही वस्तु  प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नाही, याचा अर्थ असा की  जर प्रकाश या तार्‍यामधून बाहेर जाऊ शकत नाही म्हणजेच दुसरे काहीही अशा तार्याच्या पृष्टभागाहुन बाहेर जाऊ शकत नाही.


अशा या तार्‍याना कृष्णविवर असे म्हणतात.

No comments:

Post a Comment