Powered By Blogger

Monday, December 27, 2010

सूर्य आणि चंद्र आपले रंग बदलताना का दिसतात ?

स्वच्छ वातावरणात सूर्य आणि चंद्र त्यांच्या उदयाच्या किवा अस्थाच्या वेळेला लाल रंगाचे दिसतात परंतु त्यांचा खरा रंग हा पांढरा आहे, दुपारी किवा मध्यरात्री जेव्हा ते बरोबर डोक्यावर असतात तेव्हा ते सफेद रंगाचे दिसतात.
जेव्हा ते क्षितीजाजवळ असतात तेव्हा त्यांच्यापासून येणाऱ्या प्रकाशाला आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वातावरणाच्या जास्त जाडीतून प्रवास करावा लागतो. हे समजण्यासाठी एका पाण्याच्या ग्लासात ठेवलेल्या पेन्सिलीची कल्पना करा. जेव्हा पेन्सिल आपण सरळ धरतो तेव्हा तिची कमी लांबी ओली  होते आणि जेव्हा आपण ती वाकडी करतो तेव्हा तिची जास्त लांबी ओली होते.  आता हे पाणी म्हणजेच पृथ्वीचे वातावरण समजा आणि पेन्सिल म्हणजे प्रकाश.
हवेतून प्रकाश प्रवास करताना निळ्या रंगाचे विकिरण होते आणि निळा रंग इतरत्र दिशांना फेकला जातो. बाकी उरलेल्या प्रकाशात मुख्यत लाल, इतर रंग आणि अल्प प्रमाणात निळा रंग उरतात. म्हणून आपल्याला क्षितिजाजवळ सूर्य आणि चंद्र लालसर रंगाचे आढळून येतात.
विकिरण झालेला निळा रंग आकाशाला आणि दूर असणाऱ्या पर्वतांना निळी छटा प्रदान करतो.
अवकाशात असलेले इतर तारे आपल्याला दिवसा दिसत नाहीत कारण त्यांचा प्रकाश निळ्या रंगाच्या विकीरणामुळे झाकला जातो.

- सी. सी. एम. आर.  ASK A SCIENTIST   वरुन.

No comments:

Post a Comment