Powered By Blogger

Sunday, December 12, 2010

प्रकाशाच्या वेगाने आपण का प्रवास करू शकत नाही ?

१९०५ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनने प्रकाशाच्या वेगासंबंधीचा स्थिर सिद्धांत त्याच्या 'मर्यादित सापेक्षता' सिद्धान्तामध्ये मांडला. आईन्स्टाईनने या सिद्धान्तामध्ये असे मत मांडले की प्रकाशाचा वेग कुठल्याही स्थितीमध्ये सारखाच म्हणजे ३ * १० ^ ८ मी. /सें. एवढा असतो. दुसर्‍या शब्दामध्ये सांगायचे तर प्रकाशाचा वेग कुठल्याही निरीक्षकासाठी मग तो स्थिर नसलातरी त्याच्यासाठी व प्रकाशाच्या स्रोतासाठी सारखाच असतो.

हे समजण्यासाठी एक उदाहरण घेउ. कल्पना करा कि तुम्ही एका कारने १०० कि.मी. वेगाने प्रवास करत आहात.तुमच्या बाजुने तुमच्याएवढ्या वेगाने जानारी वाहने तुम्हाला स्थिर जाणवतात. तसेच तुमच्यापेक्षा कमी वेगाने जानारी वाहने मागे पडत जातात.पण प्रकशाच्या बाबतीत असे नाही. जर तुम्ही प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असाल आणि तुमच्या बाजुने एखादा प्रकाश झोत प्रवास करत असेल तर तो तुम्हाला स्थिर जाणवत नाही. उलटपक्षी तो त्याच वेगाने तुमच्या पुढे निघुन जाइल.(म्हनजेच प्रकाशाला overtake करणे शक्य नाही). म्हणजेच प्रकाशाचा वेग हा स्थिर निरीक्षक (static frame observer) आणि चल निरीक्षक(moving frame observer) दोघांसाठी सारखाच असतो (there is no relative speed for light)

प्रकाशाचा वेग हा 'प्रकाशाने किती अंतर पार केले' याला भागिले 'त्याला यासाठी एकूण किती वेळ लागला'

वेग = अंतर / काळ

 या समीकरणाने केले जाते. एक स्थिर सिद्धांत मांडण्यासाठी आईन्स्टाईनने वेगाच्या व्याख्येमध्ये असलेल्या अंतर आणि काळ यांच्या मूळ कल्पना बदलल्या. त्याने असे सांगितले की अंतर आणि काळ यांच्यामध्ये आपणास असे गृहीत धरले पाहिजे की कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगापेक्षा जलद जाऊ शकत नाही ही गोष्ट कळण्यासाठी त्याने मर्यादित सापेक्षता सिद्धान्तामध्ये ( Special Relativity Theory) असे मत मांडले की एखाद्या गोष्टीचे वस्तुमान हे त्या गोष्टीच्या वेगाप्रमाणे वाढते. जेव्हा एखादी गोष्ट प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असेल तेव्हा तिचे वस्तुमान अनंत होते, म्हणजेच प्रचंड वेगाने प्रवास प्रवास करण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज असते.  सध्यातरी असला प्रचंड शक्तीचा स्रोत उपलब्ध नाही. म्हणून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करने अशक्य आहे.

आतापर्यंत अतिसूक्ष्म भौतिकशास्त्राच्या ( Particle Physics) प्रयोगामध्ये वेगाप्रमाणे बदलणारे वस्तुमान खूप वेळा पडताळले आहे. प्रकाशाचे कण ( Photons of lights) यांना वस्तुमान नसल्याने ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.

No comments:

Post a Comment