सर्वप्रथम आपणा सर्वाना राणे परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !! मकरसंक्रांत
मकरसंक्रांत हा भारतातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे. या दिवशी सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकतो म्हणून या सणास उत्तरायण (उत्तर - उत्तर दिशा,आयन म्हणजे अवकाशात
सरकने) असेही म्हणतात. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. भारतात विविध ठिकाणी या सणास विविध नावे आहेत. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांती (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांती (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो. उत्तरायणात मरण आल्यास मोक्ष प्राप्त होतो अशी समजूत आहे.मकर संक्रांतीपासून खरेतर उन्हाळ्याची सुरुवात होते. या वर्षी संक्रांति १५ जानेवारी(नेहमी १४ जानेवारीला असते) ला आहे म्हणजे अवघ्या ७० वर्षांनी ती एक दिवस पुढे सरकली आहे. उद्या संक्रांति आहे आणि पुण्यकाल सकाळी ७.१६ वाजेपासून ते संध्याकाळी ६.१९ पर्यंत आहे. या काळाच्या बरोबर मध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे, पुण्याकालात केलेली दान धर्म पुण्य देवून जातात. चला तर मग मित्रानो आपण सोबत साजरी करूयात आनंदाची मकरसंक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला".
"
वाचाल तर वाचाल !!
Thursday, January 13, 2011
Wednesday, January 12, 2011
भविष्याबद्दल थोडेसे - १
अरीस्टोटल महान विचारवंत याचा असा विश्वास होता कि विश्व हे अनंत आहे.त्याने असे दाखवून दिले कि नैसर्गिक आपत्ती जसे महापूर, भूकंप इ. सभ्यaristotतेला पुन्हा सुरु करतात(पहिल्यापासून). विश्व हे अनंत आहे आणि त्या काळी या सर्व गोष्टी एक अज्ञात शक्ती च्या आधीन आहेत असे मानले जाई.
विश्वाला सुरवात असेल असे जर आपण मानले तर एक प्रश्न नक्की निर्माण होतो तो म्हणजे, सुरवातीच्या अगोदर काय घडले असावे? विश्व निर्मितीच्या अगोदर देव काय करत होता? जे लोक असे प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी तो नर्कलोक तर तयार करत नव्हता ना?(हा हा ).जर असे असेल तर मग वेळेची सुरवात कशी झाली? काळ हा पूर्वीपासून अनंत होता कि तो विश्वाबरोबर सुरु झाला? जर्मन शास्रज्ञ इमानुअल कान्ट यांच्या मते जर विश्वाला सुरवात असेल तर त्याची सुरवात व्हयला अनंत काळ का लागला तसेच जर विश्व अनंत असेल तर मग त्याला या स्थितीत यायला अनंत काळ का लागला?
म्हणजेच काळ हा अनंत आहे. अनंत भूतकाळापासून चालू आहे आणि अनंत भाविष्यापर्यंत चालू राहील.मग विश्व असो व नसो काळ हा अनंत आहे. आजही हि कन्सेप्ट बरेच शास्रज्ञ मानतात.
परंतु काळ हा अनंत आहे हि संकल्पना १९०५ मध्ये संपुष्टात आली, जेव्हा सर आईस्टाईन यांनी मर्यादित सापेक्षता सिद्धांत प्रस्तुत केला. या सिद्धांताच्या मते काळ आणि अवकाश अनंत नाही. ती गतीज परिमाणे आहेत आणि त्यांची रचना ठरवण्यास विश्वातील पदार्थ आणि उर्जा कारणीभूत आहेत. म्हणजेच विश्वाच्या सुरुवातीच्या आधीच्या काळाविषयी बोलणे व्यर्थ,निरर्थक आहे. काळ हा विश्वाच्या बरोबरच सुरु झाला आहे, तसेच विश्वाच्या आधीच्या काळाबद्दल बोलणे म्हणजे उत्तर ध्रुवावर जाऊन उत्तर दिशा कोणती असे विचारल्यासारखे आहे. (जो तिथे अस्तित्वात नाही).
विश्वाबाद्द्दल असणाऱ्या सर्व संकल्पनांमध्ये १९२० मध्ये झपाट्याने बदल झाला जेव्हा एडविन हबल यांनी माउंट विल्सन वरून त्यांच्या १०० इंच दुर्बिणीतून अवकाश निरीक्षण सुरु केले.त्यांना असे दिसून आले कि अवकाशात तारे सर्वत्र सारखेच विखुरलेले नाहीत ते एकाच ठिकाणी खूप सार्या प्रमाणात गुच्छ करून आहेत त्यांचा आपण दीर्घिका असे म्हणतो. आपण ज्या दिर्घिकेत राहतो त्याला आपण आकाशगंगा असे म्हणतो.हबल यांनी अशा पुष्कळ दिर्घिकांचा आभ्यास केला. ते दिर्घीकांपासून येणाऱ्या प्रकाशावरून त्यांच्या वेगाचा अंदाज लावू शकले. काळाबरोबर अवकाश बदलत नाही या संकल्पनेला धरून त्यांना से वाटले होते कि जितक्या दीर्घिका आपल्या जवळ येत आहेत तितक्याच दीर्घिका आपल्यापासून दूर जात आहेत. पण आश्चर्य असे कि नंतर हबल यांना निरीक्षणावरून असे समजले कि जवळ जवळ सर्वच दीर्घिका आपल्यापासून दूर जात आहेत इतकेच नाही जितक्या त्या आपल्यापासून दूर आहेत त्या तितक्याच वेगाने आपल्यापासून दूर जात आहेत. म्हणजेच आवकाश हे काळाबरोबर बदलत नाही अशी जी संकल्पना होती ती फोल ठरली. विश्व हे काळाबरोबर बदलत आहे, जसजसा काळ जातोय तसतसे विश्व हे प्रसरण पावत आहे असे हबल यांनी सिद्ध केले.
विश्वाचे प्रसारण होत आहे हा २० व्या शतकातला अत्यंत महत्वाचा अविष्कार ठरला. विश्वाला सुरवात असेल या मुद्द्याला या शोधणे आणखी दुजोरा मिळाला.जर दीर्घिका ह्या एकमेकांपासून दूर जात आहेत म्हणजेच भूतकाळात त्या एकमेकांच्या जवळ असण्याची शक्यता वाढली.तसेच जर त्यांचा वेग हा स्थिर असेल तर याचाच अर्थ त्या १५ अब्ज वर्षापूर्वी एकावर एक असल्या पाहिजेत असा अनुमान काढण्यात आला. मग हीच तर विश्वाची सुरवात नसेल ना? बरेच शास्रज्ञ तरीही हे मानण्यास राजी नव्हते कि विश्वाला सुरवात असेल कारण असे झाले तर
भौतीक शास्रातले नियम फोल ठरतील. म्हणून विश्वाचे प्रसारण या सिद्धांताला त्यांनी पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला.
या सिद्धांताला विरोध करणारा एक सिद्धांत बोंडे,गोल्ड आणि होयल यांनी १९४८ मध्ये मांडला, स्टेडी स्टेट थेरी म्हणजेच विश्वाच्या स्थिर अवस्थेचा सिद्धांत. या सिद्धांतात असे सांगण्यात आले कि दीर्घिका ह्या दूर जात राहतात आणि नवीन दिर्र्घिकांचा जन्म होत राहतो. विश्वात सतत निर्माण होत राहणाऱ्या पदार्थांपासून किवा द्रव्य पासून या दीर्घिका निर्माण होत राहतात. तसेच विश्व हे अनंत आहे आणि ते प्रत्येक वेळेस सारखेच भासते.
परंतु प्रयोगाद्वारे जी निरीक्षणे करण्यात आली ती या सिद्धांताला फोल ठरवत होती.
विश्वाला सुरवात आहे या सिद्धान्ताविरुद्ध अजून एक सिद्धांत मांडला गेला तो असा, विश्वाच्या सुरुवातीला विश्वात अंकुचन होत होते. सर्व दीर्घिका एकमेकांच्या जवळ येत होत्या परंतु पदार्थाच्या परिवलनामुळे आणि त्यामध्ये असणाऱ्या अनियमिततेमुळे ते एका ठिकाणी न येता एकमेकांना चुकवून दूर गेले (ज्या प्रमाणे दोन्ही हातांची बोटे फैलावून हात एकमेकांवर जोडले कि बोटे एकमेकांच्या मधून निघून जातात).
परंतु स्टीफन हॉकिंग यांनी असे दाखवून देले कि सुरुवातीला विश्व हे बिंदूसमान होते. असा बिंदू जिथे अनंत घनता आणि कालअवकाश वक्रता होती आणि तीच काळाची सुरुवात होती.
या त्यांच्या सिद्धांताला अचूक ठरवण्यासाठी अवकाशातील मायक्रोवेव निरीक्षणे त्यांनी केली. या
मायक्रोवेव आपल्या मायक्रोवेव ओवन मधल्या मायक्रोवेव सारख्याच होत्या परंतु त्यांची उर्जा कमी होती. आपण आजही त्या मायक्रोवेव अनुभवू शकतो. चित्र नसताना टीव्ही वर येणाऱ्या मुंग्या हा त्याच मायक्रोवेव चा प्रताप आहे.
या मायक्रोवेव ची उर्जा प्रचंड होती पण जसजसे विश्व हे वाढत गेले त्यांची ऊर्जाही कमी कमी होत गेली. आणि तेच मायक्रोवेव आपण आज अनुभवतो.
स्टीफन यांचा सिद्धांत विश्वाला सुरुवात आहे हे जरी सांगत असला तरी ती कशी झाली हे सांगू शकत नाही. आनंत घनतेच्या बिन्दुजवळ सापेक्षता सिद्धांताची गणिते सुद्धा फोल ठरतात म्हणूनच सापेक्षता सिद्धांत विश्वाची सुरवात कशी झाली हे सांगू शकत नाही परंतु त्यानंतर विश्व हे कसे आहे हे सांगण्यास मदत करतो.
म्हणूनच विश्वाला सुरुवात झाली ते खरे पण ती कशी झाली असे विचाराने म्हणजे दक्षिण ध्रुवावर जाऊन दक्षिण दिशा विचारण्यासारखे आहे.
(बाकी नंतर लिहेल आता हात दुखून आलेत)
स्टीफन हॉकिंग यांचा लेखाचा मराठी अनुवाद - सुरज राणे

Monday, January 10, 2011
वस्तुमानाचा काळा वरील परिणाम !!
एखाद्या भूपृष्ठाला समांतर रित्या ताणलेल्या लवचिक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता त्या वस्तूभोवती पडदा जसा थोडा वाकतो, त्याच रीतीने वस्तुमान असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या काल-अवकाशाला अतिसूक्ष्मपणे वाकवते (बाक निर्माण करते), आणि तो 'वाकवण्या'चा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे "गुरुत्वाकर्षण" असा एक उपसिद्धांत आइन्स्टाइनने आपल्या सापेक्षतावादाच्या सामान्य सिद्धांतात इ.स. १९१५ मधे सादर केला होता.
वर म्हटलेल्या पडद्यावर ठेवलेली वस्तू जर भोवऱ्यासारखी स्वतःभोवती फिरत असली तर ती आपल्याभोवती पडद्यात आणखी थोडा "बाक" निर्माण करते, तीच गोष्ट, पृथ्वीसारखी स्वतःभोवती फिरणारी वस्तू तिच्याभोवतीच्या काळ-अवकाश फ़िरताना करते असेही आइन्स्टाइनने म्हटले होते.
त्यानंतर कित्येक वर्षांनी हा उपसिद्धांत अचूक असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळाची निरीक्षणे/मापने करून सिद्ध केले.
म्हणूनच आज गुरुत्वाकर्षण हे बल नसून काल-अवकाश रुपी पडद्याचे वाकणे आहे.
हि काळ अवकाशाची व्याख्या विकिपीडिया वर आहे. काल रात्री स्टीफन हॉकिंग यांचा काल यात्रेवर कार्यक्रम बघितला. (मी त्यांचे सर्व कार्यक्रम तसे बघतच असतो). वस्तुमानाचा काळा वर परिणाम होतो असे त्यात दाखवले होते. खूप वस्तुमान असलेल्या भूगोलाजवळ काळ हा मंदावतो असे सांगितले होते.
आईस्टाइन ने दिलेल्या सिद्धांताप्रमाणे विविध गुरुत्व बल असलेल्या ठिकाणी वेळ सुद्धा वेगळी असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील गुरुत्व बल हे पृथ्वीपासून उंचीवर असलेल्या ठिकाणापेक्षा जास्त आहे म्हणजेच पृथ्वीवरील काळ हा पृथ्वीपासून उंचावर असलेल्या काळापेक्षा मंद असेल.
कार्यक्रमाच्या मध्यात कन्सेप्ट समजण्यासाठी एक उदाहरण दिले ते सांगतो, इजिप्त मधील भव्य पिरामिड याचे वस्तुमान कईक टन आहे म्हणजेच, या भव्य वस्तुजवळ आपल्याला काळ मंदावण्याचे जिवंत उदाहरण सापडेल. एखादा कामगार पिरामिड जवळ समजा झाडूने झाडत आहे, पिरामिड जवळ असणाऱ्या लोकांना तो नेहमीपेक्षा कमी गतीने झाडताना दिसेल तसेच जसे आपण स्लो मोशन मध्ये एखादा सिनेमा बघतो एवढेच कि हि स्लो मोशन फक्त आपल्याला जाणवेल अशी असेल(जास्त नसेल). याउलट जर पिरामिड जवळ उभ्या असलेल्या एखाद्या माणसाने पिरामिड पासून दूर अंतरावर उभ्या असलेल्या लोकांकडे बघितले तर त्याला त्यांच्या हालचाली त्याच्याजवळील लोकांच्या हालचालींपेक्षा वेगवान वाटतील.
या सर्व उदाहरणांद्वारे हे सिद्ध होते कि काळ वस्तुमानामुळे मंदावतो.
विश्वात सर्वात जास्त वस्तुमान हे कृष्ण विवाराचे असते. म्हणजेच जर आपण कृष्ण विवाराजवळ उभे असाल तर आपल्यासाठी काळ हा खूप खूप जास्त मंदावेल इतका कि पृथ्वीवरील काळापेक्षा निम्मा. समजा दोन जुळे भाऊ आहेत,राम आणि श्याम. त्यांच्यापैकी राम एका अंतरीक्ष यानात बसून अंतरिक्षात जातो. जेव्हा तो पृथ्वीवरून जातो तेव्हा त्याचे आणि श्याम चे वय १० वर्ष एवढे असते. आता राम हा एका विशाल कृष्ण विवराभोवती गोल प्रदक्षिणा करतो. पृथ्वीवरून जेव्हा श्याम त्याच्या यानाकडे बघतो तेव्हा त्याला तो 60 मिनिटात एक प्रदक्षिणा पूर्ण करताना दिसतो परंतु कृष्ण विवाराजवळ काळ मंदावल्याने राम ला यानामध्ये एक फेरी पूर्ण करण्यास फक्त ३० मिनिटे लागतात. जर राम च्या हिशोबाने तो एक वर्षांनी पृथ्वीवर आला तर त्याला जाणवेल कि पृथ्वीवर २ वर्ष निघून गेली आहेत म्हणजेच त्याचा भाऊ श्याम हा आता १२ वर्ष वयाचा आहे. या वेळेस रामाचे वाय ११ वर्ष असेल आणि श्याम चे १२ वर्ष.
म्हणजेच राम हा भविष्यात आला असे म्हणायला हरकत नाही.
या कार्यक्रमाचे एपिसोड youtube किवा discovery.videos या वेब साईटवर सुद्धा बघायला भेटतील. ते बघा आणि आपले अभिप्राय कळवायला विसरू नका.
- सुरज

Subscribe to:
Posts (Atom)