जर आपण चन्द्र नसलेल्या म्हणजेच आमवसेच्या रात्री आकाशाकडे बघितले तर आपल्याला शुक्र,मंगळ,गुरु आणि शनि हे तारे प्रखरतेने लखलखताना दिसतात. आपल्या आकाशगंगेत लाखो करोड़ो तारे आहेत जे आपल्या सूर्यासारखे आहेत पण ते आपल्यापासून खुप दूर आहेत. त्यातील काही तारे आपली जागा बदलताना दिसतात,असे का होते कारण जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा आपण विविध जागांवरुण त्यांच्याकडे पाहतो आणि ते आपल्याला जागा बदलताना दिसतात.तारा जितका आपल्याला जवळ असेल तो तितका जास्त जगा बदलताना आपल्याला दिसतो. प्रोक्सिमा सेंचुरी तारा हा ४ प्रकाशवर्ष इतका दूर आहे ( १ प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशकिरण एका वर्षात जितक्या दूर जातात ते अंतर होय). आणि आपला सुर्य आपल्या पासून केवल काही प्रकाश मिनिटे दूर आहे. जे काही तारे आपण उघड्या डोळ्यानी पाहतो ते आपल्याला संपूर्ण अकाशभर पसरलेले दिसतात पण ते एका पट्ट्यात आहेत आणि त्या पट्ट्याला आपण आकाशगंगा असे म्हणतो.
इ स १९७० च्या पुर्विपर्यंत बरेच खगोलशास्त्रज्ञ असे मानत की जे काही तारे आपल्याला दिसतात ते एका चकती प्रमाने असणार्या एका आकारात बद्ध असावेत, त्यालाच आपण आज स्पायरल ग्यालाक्सी (spiral Galaxy ) असे म्हणतो.
१९२४ पर्यंत एकच आकाशगंगा आहे असे मानले जात होते,परंतु नंतर अमेरिकन शास्त्रज्ञ एडविन हबल यांनी सांगितले की आपली आकाशगंगा इकटी नाही. तिच्यासारख्या अजुन खुप सार्या आकाशगंगा अंतराळात आहेत, आणि त्यामधे अंतर( पोकळी ) आहे. हबल यांनी त्यांचे म्हनने पटवून देण्यासाठी अंतर मोजन्याच्या काही किचकट पध्हती चा वापर केला. त्यानी ९ आकाशगंगा चे अंतर मोजुन दाखवले
आपण ज्या आकाशगंगेत राहतो ती १००,००० प्रकाशवर्ष एवढे अंतर पसरलेली आहे. आणि ती स्वताच्या अक्षाभोवती फिरते. तिच्या फिरत्या बाजूमध्ये (spiral arms ) असणारे तारे तिच्या अक्षाभोवती फिरतात. त्यांना एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी काही १०० दश लक्ष वर्ष लागतात
आपला सूर्य हा आपल्या आकाशगंगेतला एक साधारण,मध्यम आकाराचा पिवळा असा तारा आहे.
हे सर्व तारे आपल्यापासून खूप दूर आहेत, इतके कि ते आपल्याला एका प्रकाशाच्या बिंदू सारखे दिसतात मग असे असून सुद्धा आपण त्यांचे अंतर कसे सांगू शकतो? तार्या पासून निघणार्या प्रकाशाच्या रंगावरून याचा अंदाज लावता येतो. विज्ञानं
न्यूटनला असे आढळून आले एखाद्या त्रिकोणी काचेच्या तुकड्या (प्रीस्म) वर सूर्याचा प्रकाश पडला तर त्याचे विभाजन विविध रंगामध्ये होते (ज्याप्रमाणे आपण इंद्रधनुष्यात रंग पाहतो त्या प्रमाणे). त्याला स्पेक्ट्रम असे म्हणतो. जर आपण मोठ्या दुर्बिणीतून आकाशाकडे बघितले
तर आपण तार्याचा प्रकाश स्पेक्ट्रम बघू शकतो. प्रत्येक तार्याला त्याचा स्वताचा स्पेक्ट्रम आहे. एखाद्या तप्त तर्याकातून निघणारा प्रकाश किवा स्पेक्ट्रम त्या तार्याच्या तापमानावर अवलंबून असतो म्हणजेच दोन तार्यांच्या स्पेक्ट्रम वरून आपण एखाद्या तार्यावर किती तापमान आहे हे सांगू शकतो. तसेच आपणास माहित आहे कि रासायनिक पदार्थामध्ये एक विशिष्ट रंग शोषून घेण्याची क्षमता असते म्हणजेच एखाद्या तार्यापासून येणाऱ्या स्पेक्ट्रम मध्ये नसलेल्या रंगावरून एखाद्या तार्यावर असणाऱ्या रासायनिक पदार्थांची माहिती आपण मिळवू शकतो.

No comments:
Post a Comment