Powered By Blogger

Thursday, December 30, 2010

चन्द्र मोहिम अपोलो-११ मधील सत्य

२००७ सालातील हि गोष्ट, एका रशियन चानल वर एक छोटीसी फिल्म दाखवली गेली होती. हि फिल्म नासाच्या अंतराळविरांच्या संदर्भात होती. या मध्ये असे दाखवले गेले कि या अंतराळवीरांचा सामना काही परग्रहातील सभ्यातेशी झाला. रशियन युएफओलोजीस्ट व्लादिमीर अजाजा आणि खगोलशास्रज्ञ येवजेनी अर्सुखिन यांनी सांगितले कि १९६९ ते १९७२ च्या दरम्यान जे काही चंद्र अभियान झाले त्यात असे आढळून आले कि चंद्रावर एलिअन बेस आहे. चंद्रावर पृथ्वीबाहेरील काही बुद्धिवान पर्ग्राहावासियानचे तळ आहे.

अपोलो अभियान झाले तेव्हापासून ते आतापर्यंत ह्या विषयी बर्याच गोष्टी कानावर आल्या. असे म्हटले जाते कि चंद्राची दुसरी बाजू, जी पृथ्वीवरून दिसत नाही तेथे परग्रह वासियांचा तळ आहे. बर्याच वेळा असा प्रश्न उपस्तीत केला गेला, कि चंद्रावर झालेल्या मोहिमेनंतर आजपर्यंत तेथे एखादा मनुष्य तळ का नाही उभारला गेला किवा आजपर्यंत तसले प्रयत्न का नाही केले गेले? 
अमेरिकेने २०२० पर्यंत चंद्रावर पुन्हा मोहिमेचा दावा केला आहे परंतु असे असुनही नासाने या बाबत अजून कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.
चंद्रावर असणाऱ्या परग्रहवासियाबद्दल जास्त माहिती पुरवनारे  दुसरे तिसरे कुणी नसून चंद्रावर गेलेले अंतराळवीरच आहेत. खासकरून नील आर्मस्ट्रांग त्यांच्या म्हणण्यानुसार चंद्रावर एलिअन बेस आहे आणि त्यांनी मनुष्यांना चंद्रापासून दूर राहण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.  नौदलाचे इंटेलीजेंसी ऑफिसर मिल्टन कूपर यांच्या मतानुसार तेथे एलिअन बेस तर आहेच  आणि अमेरिकी नौदलात त्याला  "लुना"  या नावाने ओळखतात. चंद्रावर एलिअनची  मोठी  मोठी याने  आहेत आणि ते छोट्या चकतीप्रमाणे असणाऱ्या तबकाडीमधून पृथ्वी भ्रमण करण्यासाठी कधी कधी येत  असतात.

नील आर्मस्ट्रांग आणि एडविन बज एल्डरिन यांनी २१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर  उतरण्याच्या पहीले  उडती तबकडी बघितली. या  दिवशी  त्यांनी  चंद्राच्या  अंधारलेल्या  भागात  चमकणारा  प्रकाश  पहिला असे  म्हटले  होते. हि गोष्ट या  घटनेच्या  दूरदर्शन  प्रसारणात ऐकण्यात आली. मिशन कंट्रोल ने या बाबत आणखी माहिती पुरवन्यास   सांगितले  परंतु   या नंतरचा  जो काही संवाद  होता तो स्पष्ट एकू आला नाही. नासाचा  एक पूर्व कर्मचारी ऑटो   बाइंडर ने नासाचा संवाद आपल्या VHF रिसीविंग डिवाइस मधे रिकॉर्ड केला त्यामधे नसाने विचारले होते  "तिथे काय आहे?" अपोलो वरुण उत्तर आले "These babies are huge,sir  ! enormous! oh,my god! you don't belive it! I am telling you there are other spacecrafts out there, lined up far side of creter edge! They are on the moon, watching us ( या आकृत्या विशाल, फारच विशाल आहेत, श्रीमान! तुम्हाला विश्वास होणार नाही! पण येथे क्रेटर जवळ एका सरल रांगेत दूसरी  अंतरिक्ष याने आहेत! त्यांची आमच्यावर नजर आहे )

काही लोकांचे असे म्हनने  आहे की नासाला चंद्रावर असणार्या  एलियन आणि त्यांच्या यानाबद्दल अगोदर पासून माहित होते परंतु सारे प्रसारण गोपनीय ठेवण्यात आले. अंतराळवीरांना याबाबत काही बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच या  मोहिमेचे  कागद्पत्रक , विडिओ  क्लिपिंग इत्यादि चोरीला गेले अशी घोषणा  केली गेली. १९७९ मधे मोरिस चेटलेन हे नासाच्या  communication  विभागाचे प्रमुख होते त्यानी या गोष्टीला दुजोरा दिला की नील आर्मस्ट्रोंग यानी चंद्रावर दोन तबकडया बघितल्याची सूचना दिली होती. चैटलेन  यानी असेही सांगितले की नासाला या बाबत सर्व माहिती होते परंतु आजपर्यंत याबाबत कुनाल काहीही सांगन्यात आले नाही.

नील आर्मस्ट्रोंग यानी तबकडया बघितल्याची सूचना दिली होती पण, ती सूचना नासाने सेंसर म्हणून बाद केली. वैज्ञानिक डॉ. अलेक्सेंद्र कजानतसेव यांच्या मते बज्ज एल्डरिन यानी चंद्रावर उतरलेल्या मोड्यूल मधून त्या  यानांचे रंगित फोटो काढले. त्यानी नील आर्मस्ट्रोंग चंद्रावर पाय ठेवेपर्यंत यानांची रेकॉर्डिंग चालू ठेवली होती.  डॉ. अजाज यांचा दावा आहे की अंतराळविरांच्या चंद्रावर पोहोचन्याच्या नंतर काही मिनिटातच परग्रहवासी आपल्या यानातुन फरार झाले.मॉरिस चैटलेन  यांनी या गोष्टीला हि दुजोरा दिला कि बर्याच वेळा अपोलो ११ चे redio  संदेश बाधित करण्यात आले जेणेकरून जगाला या सत्यापासून वंचित ठेवण्यात यावे.

चैटलेन  असेही सांगतात कि सर्व अपोलो आणि जेमिनी विमानांचा एका विशिष्ट अंतरापर्यंत पाठलाग केला गेला, याची सूचना अंतराळवीरांनी दिली होती पण त्यांना या संदर्भात चूप राहण्याचे आदेश दिले गेले.
काही वर्षापूर्वी नील आर्मस्ट्रोंग  बरोबर एका मुलाखतीत नील सांगत होते :-   सर्व अविश्वसनीय होते.आम्हाला याबद्दल कदाचित माहिती होते, आणि  एलिअनस  कडून याबाबत चेतावणी देखील मिळाली होती. त्यामुळे तिथे स्पेस स्टेशन किंवा  मून सिटी बनवता आली नाही. नील यांनी असेही सांगितले कि त्यांचे यान आपल्या यानापेक्षा कितीतरी मोठे आणि टेक्नोलोजी च्या बाबतीत आपल्या पेक्षा कितीतरी श्रेष्ट होते.
आर्मस्ट्रोंग यांनी सांगितले कि हि एक सत्य घटना आहे.याबाबत खोल वर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला पण, ते म्हणाले कि या बाबतीत सत्य लपवण्यात सी आय ए  चा हात होता.

सत्य काहीही असो परंतु मानव जातीची एवढी मोठी मोहीम आणि तिचे दस्तावेज चोरट्यांकडून लंपास व्हावे हे मनाला न पटण्यासारखे आहे.
http://rahasya.romanch.blogspot.com/
मराठी संवाद- सुरज राणे

Tuesday, December 28, 2010

3G म्हणजे ?

मोबाईल फोन ही संकल्पना १९४६ पासून व्यवहारात आहे. लष्करी कारणांसाठी सुरू झालेला "मोबाईल फोन' सत्तरच्या दशकात मोटारीमध्ये वापरला जाऊ लागला. त्यामध्ये जपानी बनावटीच्या मोटारी आघाडीवर होत्या. या "मोबाईल फोन'ला "वन जी' (फर्स्ट जनरेशन) मानले जाते. "जी' म्हणजे जनरेशन. ही मोबाईल फोनची "पहिली पिढी' मानली गेली. केवळ बोलण्यासाठी या फोनचा वापर होत होता.

नव्वदच्या दशकानंतर तंत्रज्ञानात झपाट्याने झालेल्या बदलाचा परिणाम म्हणजे "टू जी' (सेकंड जनरेशन). नोकिया या जगातील अव्वल मोबाईल कंपनीचे मुख्यालय ज्या देशात आहे, त्या फिनलंडमध्ये "टू जी' मोबाईल फोनद्वारे प्रथमच "एसएमएस' पाठविता येऊ शकले. त्यापाठोपाठ मोबाईलवरून इंटरनेट मिळविणे, एकाच वेळी अनेकांशी संभाषण करता येणे, आवडीप्रमाणे हॅण्डसेटमधील ऍप्लिकेशन्स वापरणे आदी सुविधा "टू जी'मध्ये मिळाल्या.
आता आला आहे, "थ्री जी' (थ्री जी किंवा थर्ड जनरेशन) मोबाईल फोन. "वन जी' आणि "टू जी'मधील सर्व सुविधा तर त्यात आहेतच; शिवाय त्यामध्ये असलेले दोषही दूर केले गेले आहेत. "थ्री जी' मोबाईल म्हणजे खिशातून बाळगता येईल, असे ऑफिस आणि थिएटर! "टू जी' मोबाईलमध्ये विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे इंटरनेट सेवा वेगवान करता येत नव्हती. "थ्री जी'मध्ये हीच सेवा घरी ३.१ एबीपीएस (मेगाबाईट प्रति सेकंद = १०,००,००० बिट्‌स प्रति सेकंद) इतक्‍या किंवा त्याहीपेक्षा अधिक वेगाने मिळू शकते. साहजिकच, मोबाईल फोनवरून घरच्या किंवा ऑफिसमधील इंटरनेटच्या वेगाने संवाद साधणे शक्‍य होते इंटरनेटवरून सध्या ज्याप्रमाणे टीव्ही "लाइव्ह' दिसतो, तसा मोबाईलवरूनही पाहता येतो

"टू जी'मध्ये एकाच वेळी अनेक मोबाईलधारकांशी (टेलिकॉन्फरन्सिंग) संवाद साधता येत होता, तो "थ्री जी'मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून साधता येईल. आरोग्यसेवा पुरविण्यासाठी खूप उपयुक्तपणे हे "व्हिडिओ कॉन्फरन्सिंग' वापरता येऊ शकेल.

या शिवाय आपल्याला हव्या त्या परिसराची ताजी माहिती (म्हणजे डिजिटल फॉर्ममध्ये तयार असलेलीच!) उदा. वाहतूक, हवामान आदींची, तत्काळ मिळू शकेल. मोबाईल ऑपरेटरकडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओ-ऑडिओमधून हवा तो, ग्राहकाला मागवून घेता येईल.

-  इसकाळ मधील लेख

Monday, December 27, 2010

सूर्य आणि चंद्र आपले रंग बदलताना का दिसतात ?

स्वच्छ वातावरणात सूर्य आणि चंद्र त्यांच्या उदयाच्या किवा अस्थाच्या वेळेला लाल रंगाचे दिसतात परंतु त्यांचा खरा रंग हा पांढरा आहे, दुपारी किवा मध्यरात्री जेव्हा ते बरोबर डोक्यावर असतात तेव्हा ते सफेद रंगाचे दिसतात.
जेव्हा ते क्षितीजाजवळ असतात तेव्हा त्यांच्यापासून येणाऱ्या प्रकाशाला आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वातावरणाच्या जास्त जाडीतून प्रवास करावा लागतो. हे समजण्यासाठी एका पाण्याच्या ग्लासात ठेवलेल्या पेन्सिलीची कल्पना करा. जेव्हा पेन्सिल आपण सरळ धरतो तेव्हा तिची कमी लांबी ओली  होते आणि जेव्हा आपण ती वाकडी करतो तेव्हा तिची जास्त लांबी ओली होते.  आता हे पाणी म्हणजेच पृथ्वीचे वातावरण समजा आणि पेन्सिल म्हणजे प्रकाश.
हवेतून प्रकाश प्रवास करताना निळ्या रंगाचे विकिरण होते आणि निळा रंग इतरत्र दिशांना फेकला जातो. बाकी उरलेल्या प्रकाशात मुख्यत लाल, इतर रंग आणि अल्प प्रमाणात निळा रंग उरतात. म्हणून आपल्याला क्षितिजाजवळ सूर्य आणि चंद्र लालसर रंगाचे आढळून येतात.
विकिरण झालेला निळा रंग आकाशाला आणि दूर असणाऱ्या पर्वतांना निळी छटा प्रदान करतो.
अवकाशात असलेले इतर तारे आपल्याला दिवसा दिसत नाहीत कारण त्यांचा प्रकाश निळ्या रंगाच्या विकीरणामुळे झाकला जातो.

- सी. सी. एम. आर.  ASK A SCIENTIST   वरुन.

Friday, December 17, 2010

घर असावे घरासारखे

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी

या घरट्यातुन पिलू उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती 


-संग्रहित 

मध्यरात्र उलटल्यावर

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
-संग्रहित 

पण जाऊ दे जमलंच नाही

आपल्यालाही आवडलं असतं...

रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..

तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!

- संग्रहित 

दूर किती मी झालो

तुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहे
तुला वाटले विसरुन जाईन जे जे सारे घडले आहे

हसता हसता ठसका लागुन जर पाणी डोळ्यांतुन आले
समज इथे मी वाट पाहुनी थकलेली पण उभीच आहे.

जाता जाता कानापाशी कुजबुजल्याचा भास कधी जर
झाला, तर तू समज इथे मी तडफ़डते बडबडते आहे

तुला वाटले महिना दो महिन्यांनी मीही विसरुनच जाईन
खुळ्या , भूक तू माझी, माझी तहानही तुजपाशी आहे

तुला भरंवसा काळाच्या खपलीने सारे बुजून जाईल
मला खातरी परतुन सारे येईल जे जे माझे आहे

दर्भ बनुन बोहल्यावर तूझ्या जळेन मीही त्या होमावर
गळेल पाणी तेव्हा म्हणशिल धूर किती हा छळतो आहे

प्रेमाचे ते चार दिवस रे माझे सारे जगणे होते
स्मरणाचा तो अंतिम क्षण मरणाची माझ्या पहाट आहे

तुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहे
विसरुन जाणे शक्य नसे रे जे जे सारे घडले आहे

गीत : स्वरांगी देव

आठवतो तो समुद्र किनारा

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
तू मला भेटायला यायचीस
लाटां सारखं परतून परतून
तू मला मिठीत घ्यायचीस

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या घराची
वीट मात्र ढासळली नाही
                   - संग्रहीत 

सुर्यमाला किती वर्षात आकाशगंगेची एक फेरी पुर्ण करते ?

सर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. पण त्यापैकी बहुतांश तारे आपण पाहू शकत नाही. रात्रीच्या अवकाशामध्ये दिसणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेतील आहेत. साधारण १, ००, ००० (१ लाख) प्रकाशवर्षे व्यास असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रापासून जवळपास २६, ००० प्रकाशवर्षे आपली सूर्यमाला आकाशगंगे भोवती फिरते आहे. खरेतर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या बळावर त्याच्या भोवती फिरणार्‍या ग्रहमालेला घेऊन प्रती सेकंद २७० कि. मी. या वेगाने २० कोटी वर्षांमध्ये आकाशगंगेभोवती एक फेरी पूर्ण करतो. आतापर्यंत आपल्या सूर्याने आकाशगंगेच्या २० फेर्‍या पूर्ण केल्या आहेत.
  

Thursday, December 16, 2010

तापमानाचा प्रकाशाच्या वेगावर परिणाम होतो का ?

    मित्रानो हा खूपच छान प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे कि तेल थंडी मध्ये गोठते आणि उन्हाळ्यात वितळते. तापमान कमी झाल्यावर तेलाचा वाहण्याचा वेग कमी होतो आणि याउलट तापमान वाढविल्यावर वाढतो. परंतु प्रकाशाचे असे नाही. म्हणजेच प्रकाशाचा वेग हा तापमानावर प्रत्याक्श्रीत्या अजीबात अवलंबून नाही. परंतु तापमानाचा आणि प्रकाशाच्या वेगाचा अप्रत्यक्ष असा संबंध आहे. कसा ते आपण पाहू..

     प्रकाशाचा वेग हा भौतिकशास्रा मधील खूपच महत्वाचा भाग आहे. सन १९८१ मध्ये प्रसिद्ध शास्रज्ञ जेम्स क्लेर्क मेक्सवेल यांना असे समजले कि चुंबकीय आणि विद्दुत क्ष्रेत्र यामध्ये परस्पर संबंध आहे आणि त्यांनी दाखवून दिले कि प्रकाशाचा वेग हा दोन प्रसिद्ध अशा नैसर्गिक स्थिरांकांवरून आपण ठरवो शकतो.   त्यानंतर सर अल्बर्ट आइस्टाइन यांनी असे सांगितले कि " विश्वातील कोणतीही वस्तू प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही".
तसेच त्याने असे हि सांगितले कि प्रकाशाचा वेग हा वैश्विक स्थिरांक असून उर्जा आणि वस्तुमान यांचे सूत्र असे आहे  

E=m * Square of 'c' 

जिथे E = उर्जा , m=  वस्तुमान , c= प्रकाशाचा वेग आहे. 

याचाच अर्थ असा कि प्रकाशाचा वेग हा सर्वीकडे स्थिर आहे. परंतु येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे c= प्रकाशाचा वेग (निर्वातामध्ये in vaccume).  

जेव्हा प्रकाश किरण एखाद्या वस्तुमान असलेल्या माध्यमातून प्रवास करतात तेव्हा प्रकाशाचा वेग कमी होतो. उदाहरणार्थ हवेतून, पाण्यातून जेव्हा प्रकाश किरण प्रवास करतात तेव्हा त्यांचा  वेग हा कमी झालेला असतो. असे होण्याचे कारण असे कि प्रकाशाचा वेग कोणत्याही वस्तूच्या वक्रीभवन सुचाकांकावर (refractive index) अवलंबून असतो.  एखाद्या माध्यमातून प्रकाशाच वेग हा पुढील सूत्राने मिळतो  

प्रकाशाचा वेग (माध्यमातून) = प्रकाशाचा निर्वात माध्यमातील वेग (c) / माध्यमाचा वक्रीभवन                         सूचकांक(n )

निर्वाताचा वक्रीकरण सूचकांक हा १ आहे.

बाकी सर्व माध्यमांचा वक्रीकरण सूचकांक १ पेक्षा जास्त आहे.
हवेचा = > १.०००३
काच = > १.५  

हवेपेक्षा काचेचा वक्रीकरण सूचकांक हा जास्त आहे म्हणजेच ज्या माध्यमांची घनता(density) जास्त असते तेथे वक्रीकरण सूचकांक हा जास्त असतो. 
पदार्थाची घनता तपामानाबरोबर बदलते आणि घनता बदलली कि प्रकाशाचा वेग सुद्धा बदलतो. यावरून आपण असे सांगू शकतो कि जर तापमान वाढले तर घनता कमी होते आणि  प्रकाशाचा वेग (माध्यमातून) वाढतो तसेच तापमान कमी झाले कि घनता जास्त होते आणि प्रकाशाचा वेग कमी होतो. 
हिर्याची घनता जास्त आहे म्हणून प्रकाशाचा वेग हा हिर्यामध्ये सर्वात कमी आहे आणि वक्रीभवन जास्त आहे.

Wednesday, December 15, 2010

रिस्क

दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो , तेव्हा बायको स्वयंपाक करत असते ,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो ,
मी चोरपावलाने घरात येतो ,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो ,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात ,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही ,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही।। 1 ।।

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो ,
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो ,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो ,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो ,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात ,
स्वैपाकघरात डोकावून बघतो ,
बायको कणीकच मळत असते ,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही ,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही।। 2 ।।

मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं ?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
मी परत बाहेर येतो , काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो ,
बाटली मात्र मी हळूच काढतो ,
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो ,
पटकन पेगचा आस्वाद घेतो ,
बाटली धुवून मोरीत ठेवतो ,
काळा ग्लासपण कपाटात ठेवतो ,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही ,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही।। 3 ।।

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं
नाही ?
ती : नाही काय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे...
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा...
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो ,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते ,
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो ,
शिवाजीमहाराज मोठ्याने हसतात ,
फळी कणकेवर ठेवून शिवाजींचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात
ठेवतो ,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते ,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही ,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ।। 4 ।।

मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस ? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकेन तुझी...!
ती : उगीच कटकट करू नका... बाहेर जाऊन गप पडा...
मी कणकेमधून बाटली काढतो , काळया कपाटात जाऊन एक पेग
मळतो ,
मोरी धुवून फळीवर ठेवतो ,
बायको माझ्याकडे बघत हसत असते ,
शिवाजी महाराजांचा स्वैपाक चालूच असतो ,
पण या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही ,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही।। 5 ।।

मी : (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं म्हणे!
ती : (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वैपाकघरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो ,
गॅसही फळीवरच होता...
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो ,
मी डोकावून बघतो... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते ,
या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही ,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत...
जाधवांचा स्वैपाक होईपर्यंत...
मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो....
कारण मी कधीच रिस्क घेत नाही।। 6 ।।

- संग्रहीत 

विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास

विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास

मंगला सामंत , सौजन्य – लोकसत्ता

केव्हाही स्त्री-पुरुष संबंध आणि केव्हाही मूल अशा नीतीनियमविरहित अवस्थेपासून ते विवाहबंधनापर्यंतचा मानवाचा प्रवास का आणि कसा झाला? या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे कोणते होते? विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायची पद्धत का व कशी सुरू झाली? विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून दाखविणारा लेख-

पुरुषाने क्रूर जंगली जीवनापासून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, नातेसंबंधाशी तो भावनिकदृष्ट्या समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले. आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहात आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले..
विवाहाच्या उत्क्रांतीचा अभ्यास कशासाठी? तर विवाह ही शरीरसंबंधाची स्वीकारलेली एक पद्धत आहे. अशा शरीरसंबंधाच्या विविध पद्धती आपल्या पूर्वजांनीसुद्धा स्वीकारल्या, बदलल्या. त्यांनाही अडचणी आल्या, पेच निर्माण झाले. त्यातून त्यांनी मार्ग कसे काढले, त्याकरिता मानसिकता कशी बदलावी लागली, हे सर्व गेल्या ५० हजार वर्षांपासून जर आपण तपासलं तर आजही विवाहासमोर ज्या अडचणी आपल्याला वाटतात, त्या सोडविण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या विचारपद्धतीचा काही उपयोग होऊ शकतो का, मार्ग सापडतो का, हे निश्चितच आपल्याला समजू शकेल.
विवाहाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाला सुरुवात करताना, सर्वप्रथम माणसाच्या शरीरात त्याच्या पूर्वजांच्या तुलनेत कोणते बदल झाले, हे आपल्याला पाहावं लागेल, कारण तरच मानवाचे वर्तन, त्याच्या भाव-भावना, मानसिकता याचा अर्थ आपल्याला समजेल. पहिला शारीरिक बदल हा मानवी स्त्रीमध्ये झाला, तो म्हणजे तिचा ‘estrus period’ म्हणजेच तिचा ‘प्रजनन काल’ उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर नाहीसा झाला. म्हणजे स्त्री-पुरुषांचे केव्हाही संबंध आणि केव्हाही मूल अशी स्थिती निर्माण झाली. साहजिक मनुष्यसंख्येवरचं निसर्गाचं नियंत्रण गेलं आणि ती स्त्री-पुरुषांची जबाबदारी झाली. स्त्रीचा ‘estrus period’ जाणे ही शारीरिक घटनाच शरीरसंबंधाच्या नियमनाच्या पद्धतीची मानवाला गरज वाटण्याची जननी आहे.
त्यानंतर माणसातला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, त्याच्या मेंदूचा आश्चर्यकारक विकास! हा पूर्ण विकास गर्भातच झाला असता, तर डोक्याचा आकार इतका मोठा झाला असता की स्त्रीला जन्म देणं शक्य झालं नसतं. म्हणून अर्भकाच्या मेंदूचा गर्भाशयातला विकास हा सुमारे ३० टक्के असतो. बाकीचा विकास हा अर्भकाने जन्म घेतल्यानंतर पुढील १५ ते २० वर्षांत होत असतो. अर्थात मनुष्याची बाल्यावस्था प्रदीर्घ झाली. त्यामुळे बालसंगोपनाची स्त्री-मातेची वर्षे वाढत गेली. ही एक प्रकारे स्त्रीवरची आपत्ती होती. कारण एका बाजूला सततच्या बाळंतपणाचा धोका आणि त्यात बालसंगोपनाचा काळ वाढलेला. ही परिस्थिती अशीच राहिली असती, तर मनुष्यप्राणी जिवंत राहिला नसता. परंतु याची भरपाई म्हणून निसर्ग आणखी एक शरीरबदल स्त्रीमध्ये आणतो आणि तो म्हणजे ‘मेनापॉज’! हा मेनापॉज फक्त मानवी स्त्रीलाच आहे. तो चिपांझी-गोरिलाच्या प्राणीमातांना नाही.
‘मेनापॉज’मुळे स्त्री मातृत्वचक्रातून मुक्त होत असते. हीच स्त्री मग आपल्या मुलीच्या-मुलांच्या संगोपनात हातभार लावते. इथे Nature’s selection हा डार्विनचा मुद्दा दिसतो. वास्तविक पुरुष हा बालकाचा जैविक पिता असताना, त्याच्याच शरीरात पितृत्वादाखल बदल देऊन ‘पिता’ म्हणून त्याला स्त्रीच्या मदतीसाठी उभे करण्याचे काम निसर्ग करीत नाही, तर तो दोन मातांना तयार करतो. एक जन्म देणारी माता आणि दुसरी आजी-माता! अशा रीतीने आजी-पालकत्वाचा उदय आपल्याला फक्त मानवी जीवनातच दिसतो. अन्य प्राणीजीवनात आजी-पालकत्व आढळत नाही. याबाबतचं संशोधन अमेरिकेतील उटाह विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानववंश शास्त्रज्ञ डॉ. क्रिस्टेन हॉक्स आणि डॉ. निकोलस जोन्स यांच्या टीमने सन १९९८-९९ मध्ये केलं. ते असे की, ‘स्त्रीला मुलं झाली की काही महिने ती अंगावर पीत असतात. मग आई त्यांना कंदमुळं देऊ लागते. पण आईला पुन्हा दिवस गेले की, त्या मुलांना ना अंगावरचं दूध मिळत ना कंदमुळं! अशा वेळी त्या मुलांची आजी, म्हणजे त्या स्त्रीची आई, त्यांच्या मदतीला येते व त्यांच्या खाण्याची जबाबदारी स्वत:कडे घेते. अशी आजी ज्या मुलाला  लाभते, ते मूल पुन्हा बाळसं धरतं व प्रगती करतं. याउलट आजी नसलेल्या मुलाचे हाल होतात.’
मुळातच स्त्रीला स्थैर्याची गरज पुरुषाच्या तुलनेत जास्त असते. तशी ती प्रत्येक प्राणीमातेलाच तिच्या बाळंतपणासाठी, एके ठिकाणी स्थैर्य गरजेचं असतं. मेंदूच्या विकासातून अग्नीचे उपयोग कळल्यावर, स्त्री ही अग्नी घेऊन गुहेत पहिली स्थिर झाली. स्त्री-समाज पुरुषाआधी स्थिर झाला, असे संशोधक मांडतात, कारण पुरुषाला स्थैर्याची गरज नव्हती.
स्थिर झालेली स्त्री, आपल्या अपत्य संगोपनात अनेक वर्षे घालवू लागल्यावर स्त्रीमध्ये ममत्व आणि वात्सल्य या भावना बहरू लागल्या. त्याचबरोबर जंगली अवस्थेतील तिची क्रूरता आणि हिंसकता यांचा झपाटय़ाने ऱ्हास होऊ लागला. मातेच्या दीर्घकाळ सान्निध्यामध्ये अपत्ये राहिल्यामुळे, त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होऊ लागला. मात्र, आजच्या भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ वगैरे भावना तेव्हा नव्हत्या. फक्त स्त्री-पुरुषांच्या जोडय़ांना जन्माला घालणारी एक माता आणि एकाच मातृत्वाने बांधलेल्या या जोडय़ा, म्हणून त्यांच्यामध्ये एक सौहार्द होते. हीच भावंडे मोठी होऊन आजच्या भाषेतल्या मामा-मावश्या व्यक्तिमत्त्वाचा मातृटोळीत समावेश होत होता. अशा रीतीने आई-अपत्ये, मामा-मावश्या, आजी असे मिळून मातृटोळ्या जमिनीवर स्थिर होऊ लागल्या.
स्त्री-समाजाच्या स्थिरतेमुळेच शरीरसंबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला. कारण आधीच्या अस्थिर आणि झाडावर राहून संरक्षण करण्याच्या कालखंडात स्त्रिया पुरुषांना सहज उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे शरीरसंबंधाचे नियमन आपोआपच होत होते. परंतु स्थिर झाल्यावर जंगली पुरुष टोळ्यांना स्त्रिया एका जागी उपलब्ध होऊ लागल्या.
पुरुषांचे ४० हजार वर्षांपूर्वीचे जीवन कसे होते? मेंदूच्या विकासामुळे पुरुष हा कळप-अवस्थेतून टोळी-अवस्थेत आलेला होता. पुरुषांमध्ये एरव्ही पितृत्वादाखल कोणताही शारीरिक बदल आणि भावनिक जाणीव निसर्गाने निर्माण केलेली नव्हती. अपत्य जन्मामध्ये आपलाही भाग असतो, याची पुरुषाला जाणीव नसल्यामुळे, मातृकुळात त्याला बांधून ठेवणारे कोणतेही पाश नव्हते. आक्रमक, हिंसक अशा जंगली पुरुषांच्या टोळ्या तेव्हा होत्या. जंगली पुरुषांचे स्थिर मातृटोळ्यांवरचे हल्ले आणि अर्भके पळविणे, हा मातांचा अत्यंत चिंतेचा विषय होता. अशा वेळेस मातृकुळांची व अपत्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय मानून, कुळाबाहेरील जंगली पुरुषांशी शरीरसंबंध टाळण्यातूनच त्या पुरुषांना दूर ठेवत असत. कुळातील पुरुषांशी म्हणजे भाऊ, मामा, भाचे यांच्याबरोबर स्त्रियांनी शरीरसंबंध ठेवणं हे त्यांना कमी धोक्याचे वाटू लागले.
आज जरी आपल्याला सख्खे भाऊ, मावसभावंडे, मामा वगैरे नात्यातले संबंध धक्कादायक वाटत असले तरी या अतिप्राचीन काळात नात्याने एकमेकांना कोणी ओळखत नसल्यामुळे, नात्यात शरीरसंबंध करू नयेत, ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. जंगली पुरुषाशी कोणत्याच स्त्रीने संबंध करू नयेत, अशी बंदी घालण्यासाठी कुळातल्याच पुरुषाशी संबंध करावेत, अशी सक्ती निर्माण करणे गरजेचे होते. त्याकरिता मातांनी ‘टॉटेम-विश्वासाचा’ उपयोग करून घेतला. कोणा पशु-पक्ष्यामुळे टोळी जन्माला आली असे मानून त्या प्राण्याचे नाव टोळ्यांना दिलेले आढळते. भारतीय संस्कृतीत अशा मूषक, मातंग, नाग, वृषभ टोळ्यांची नावे आहेत. या टॉटेमिझम्मुळे एकच कुलचिन्ह (टॉटेम) असणाऱ्या कुळातील स्त्री-पुरुष यांचे शरीरसंबंध सक्तीचे करणे सोपे गेले.
Endogamy ही अशा रीतीने शरीरसंबंधाची पद्धत म्हणून पुढील काही हजार वर्षे स्थिर झाली. या कालखंडात भावाला काही अधिकार देण्यात आले. त्यापैकी बहिणीची मालमत्ता व तिचा आईकडून येणारा वारसाहक्क सांभाळणे आणि तिच्या मुलांच्या संगोपनात हातभार लावणे, असे दोन अधिकार होते. बहिणीची अपत्ये मात्र कुळातल्या अनेक पुरुषांपासून जन्मलेली असायची. Endogamy च्या पुढील ५ ते १० हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यामुळे मातृकुळातून अनेक व्यवसाय, उद्योग उदयाला आले. हळूहळू भाऊ, मामा, भाचे या उद्योगात लक्ष घालू लागले तसेच त्यांचे जंगलातले निर्थक भटकणे संपले आणि ते अर्थपूर्ण झाले. ही मातांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब होती. लक्ष घालू लागल्यावर त्यांचं कुळातले वास्तव्य वाढलं. त्यामुळे कुळातील शरीरसंबंधाचं प्रमाण वाढून कुळाची मनुष्यसंख्या हाताबाहेर जाऊ लागली, ही मातांना चिंता होती. त्यापेक्षाही मोठी चिंता अशी होती की, वाढलेल्या शरीरसंबंधामुळे भाऊ, मामा, भाचे यांचे स्त्रियांवरून संघर्ष होऊन हिंसा होऊ लागली.
मात्र याच कालखंडात एक चांगले सामाजिक परिवर्तन येत होते. पुरुष जो कच्चा माल जंगलातून आणत होते, तो अन्य मातृकुळांनाही ते पुरवीत होते, ज्याची कुलचिन्हे भिन्न होती, त्या कुळातील स्त्रियांशी परिचय होऊन त्यांच्याशी पुरुषांशी संबंध होऊ लागले. त्याचप्रमाणे स्त्रिया आपापली उत्पादने घेऊन दुसऱ्या मातृकुळामध्ये जात असत, तिथे रात्री वास्तव्याला राहण्यातून तिथल्या पुरुषांशी शरीरसंबंध होऊ लागले. अशा रीतीने कुळातच सक्तीचे असणारे संबंध हळूहळू कुळाबाहेर जाऊ लागले. म्हणजे त्याही काळात सक्ती वा बंधने मोडणारे स्त्री-पुरुष होते, हे विशेष!
कुळाबाहेर जाणारे शरीरसंबंध हे मातांसाठी सुचिन्ह होते. त्यायोगे कुळातील संबंधांवर बंदी आणणे सोपे होते. अर्थात हळूहळू शरीरसंबंधाची पद्धत उलटी फिरली. एकाच कुळात संबंधाची जिथे काही हजार वर्षे सक्ती होती, तिथे बंदी आली. म्हणजे तांत्रिक शोधामुळे अर्थव्यवस्थेत आणि जीवनपद्धतीत झालेल्या बदलामुळे आधीची शरीरसंबंध पद्धत endogamy पूर्वजांनी संपूर्णपणे रद्द करून exogamy मध्ये प्रवेश केला.
नात्यातल्या संबंधाची काही हजार सवय झालेली असल्यामुळे, हे शरीरसंबंध लगेच बंद पडणार नव्हते. हे ओळखून त्याकरिता काही उपाययोजना आखण्यात आल्या-
* बाहेरील स्त्री-पुरुष संबंधांना मोठं उत्तेजन देण्यात आलं. जसं, आजही आदिवासी जमातीत ‘घोटुळ’ नावाची dormitory गावाबाहेर बांधून देऊन वयात आलेल्या मुला- मुलींना तिथे जाण्यात उत्तेजन देण्यात येत असते. ज्या मातृकुळातील बहुतेक स्त्री-पुरुषांनी कुळाबाहेर संबंध पत्करले त्या कुळातील शांतता व प्रगती हा अन्य कुळांचा आदर्श झाला.
* दुसरा उपाय म्हणजे एकाच मातृकुळामधील हत्या व हिंसांना बंदी आणली गेली. अर्थात ही हिंसा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कुळांतर्गत असणारे शरीरसंबंध होते. ते थांबवले तरच हिंसा थांबू शकते. त्यातून endogamy बद्दल नकारात्मक मानसिकता तयार होऊ लागली.
* तिसरा उपाय म्हणजे कोणी कुळात शरीरसंबंध केलेच तर मृत्युदंड- डोके छाटण्याची शिक्षा देण्यात येऊ लागली. त्यामुळे स्त्रियांनी आपले मुलगे व भाऊ यांना या शिक्षा होऊ नयेत म्हणून त्यांना अशा संबंधापासून परावृत्त करण्यास व स्वत: नकार देण्यास सुरुवात केली.
शेवटचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे भाऊ व बहीण यांचे वेगळे भावनिक नाते याच कालखंडापासून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. भाऊ-बहीण नात्यात जिव्हाळा व प्रेम हवे, पण शरीरसंबंध नकोत, असे अत्यंत अवघड काम मातांनी अत्यंत कौशल्याने पुढे अनेक शतके अथक परिश्रमाने केले. भाऊ-बहीण नाते हा मानवी जीवनातला चमत्कार होता. हे नाते नैसर्गिक नाही. ते कोणत्याही प्राणी जातीत नाही. ते नाते सांस्कृतिक आहे आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर निर्माण झालेले आहे आणि तो टप्पा हाच आहे, असे माझे मत आहे.
मातांचे हे प्रयत्न इतके यशस्वी झाले की, भावा-बहिणीमधील शरीरसंबंध ही लाजिरवाणी बाब होऊन ती निषेधार्ह, तिरस्करणीय झाली, ती आजतागायत! निव्वळ भाऊ-बहीणच नाही, तर मामा, भाचे, मावसभाऊ या एकाच कुळातील नात्यातील स्त्री- पुरुष शरीरसंबंध थांबवण्यात आले. एकच कुलचिन्ह असणाऱ्या कुळामधील नात्यात संबंधांना बंदी, हीच परंपरा पुढे ‘सगोत्र विवाहबंदी’ म्हणून पितृसंस्कृतीत आलेली दिसते.
अशा रीतीने endogamy सुमारे २० ते २५ हजार वर्षांपूर्वी पूर्णपणे अस्ताला गेली, की तिचे अवशेष आजच्या आदिम, आदिवासी जमातीतही शिल्लक राहिले नाहीत. पण कुळात संबंध आलेच तर प्राचीन काळात सांगितलेल्या शिक्षा तेवढय़ा या आदिम जमातीत दिसतात.
आपण पाहिले की, आपल्या पूर्वजांनी आपली जुनी endogamy सोडून देऊन त्यांनी exogamy पत्करली, यातून आज आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे, असे म्हणायला लागेल.
आज आपणही exogamy मध्ये आहोत; परंतु १५-२० हजार वर्षांमागीली exogamy ची वैशिष्टय़े फार वेगळी होती. मुख्य म्हणजे, मातृकुळातील भाऊ-बहिणी हे कुळाबाहेर शरीरसंबंध करीत होते, तरी ते दोघेही मातृकुळातच राहत होते. भाऊ संबंध करण्यापुरते कुळाबाहेर जात होते आणि बहिणींचे संबंधित पुरुष हे बाहेरून बहिणींकडे येत होते. बहिणी आपले मातृकूळ सोडत नव्हत्या. इथे बहिणींची सुरक्षितता जपली जात होती. हा रिवाज आजही काही आदिम आदिवासीमधून टिकून आहे, याचे पुरावे रॉबर्ट ब्रिफो हा आपल्या ‘X The mothers’  या खंडातून देतो. तसेच कमलाताई चट्टोपाध्याय आपल्या ‘Tribes in India’ या पुस्तकातून देतात. तसेच स्टीफन फ्यूज आपल्या १९६३च्या ‘The origin of Man and his culture’ या पुस्तकातून नागा ट्राईब्स, आसाममधील खासी, द. भारतातील नायर तसेच मध्य व पूर्व आफ्रिका, न्यू गिनी, बोर्निओ, ब्राझील वगैरे ठिकाणी मातृकुळातच भाऊ-बहिणी राहत असल्याचे पुरावे देतो. अशा प्रकारे मातृकुळाबाहेर जाऊन संबंध करण्याच्या पद्धतीला आजचे संशोधक Visiting marriage अशी संज्ञा देतात.
विशेष म्हणजे,exogamy च्या कालखंडात स्त्री चमत्काराने मूल जन्मास घालते, हे अज्ञान लयास गेले आणि पुरुषामुळे स्त्रीला मूल होते, या शास्त्रापर्यंत मानव पोहोचला. या ज्ञानामुळे पुरुषाची मन:स्थिती द्विधा झाली. आपले कुळाबाहेरील ज्या स्त्रीशी संबंध आहेत, त्या स्त्रीच्या मुलांमध्ये आपले मूल असणार आहे, याचे भान त्याला येऊ लागले. त्याचप्रमाणे ज्या स्त्रीशी आपले संबंध, ती आणि तिच्या मुलांबद्दल आपल्याला कोणतेही अधिकार नाहीत आणि ज्या बहिणीबद्दल अधिकार आणि तिच्या मुलांविषयीची कर्तव्ये, ती मुले आपली नाहीत, ही जाणीव पुरुषाला अस्वस्थ करू लागली.
पुरुषामधील हा बदल, मातृसंस्कृतीला आशादायक व आनंददायक वाटत होता. पुरुषाची अपत्यांमध्ये होणारी गुंतवणूक हा मानवी संस्कृतीच्या एका टप्प्यावरचा महत्त्वाचा बदल होता. पुरुषाच्या या हळुवार भावनेला प्रतिसाद देण्यासाठी, जगातील काही संस्कृतींनी पुरुषाला ‘सामाजिक पितृत्व’ देण्याचा रिवाज निर्माण केलेला दिसतो. मातृकुळातील पुरुषालाही इच्छा असल्यास अपत्यसान्निध्य मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. अंदाजे १० ते १५ हजार वर्षांदरम्यानचा हा काळ होता.
स्त्रीला अनेक पुरुषांपासून मुले होत होती. त्या सर्व मुलांचे पितृत्व पुरुषाला देण्याचा हा रिवाज होता. हा संस्कार म्हणजे ‘पिता बनण्याचे व्रत’ असे होते- पुरुषाची पत्नी-स्त्री (आजच्या अर्थाने पत्नी नाही) जेव्हा मूल जन्माला घालणार अशा लक्षणाची दिसते, ते चार-पाच महिने पुरुषाने भाला, कुदळीसारख्या शस्त्रांना स्पर्श करायचा नाही. शिकारीला जाण्याचे थांबवायचे. गवत, झाड, लाकूड कापायचं नाही. रक्त वाहील, असे कोणतेही काम करायचे नाही. मांस भक्षण करायचे नाही. पत्नी-स्त्री बाळंत होईपर्यंत त्याने जास्तीत जास्त झोपून राहायचे. झोपून राहण्याचे कारण बाहेर समाजात कोणी कुणाची हत्या केल्यास ते या व्रत करणाऱ्या पुरुषावर घातले जाऊ नये, म्हणून पुरुषाने मातृकुळातच जास्तीत जास्त शांत राहावे असे हे व्रत! Paternity leave ची त्या काळातील ही कल्पना म्हणावी लागेल.
या व्रतामधून एक बाब स्पष्ट जाणवते म्हणजे, पुरुषाठायीची हिंसकता कमी झालेली नव्हती. त्यामुळे अशा पुरुषाच्या अधिकारात स्त्री व तिची मुले सोपविणे, हे मातृकुळांना मान्य होणारे नव्हते. म्हणून मग त्या पुरुषाने चार-पाच महिने शस्त्र, शिकार, मांसभक्षण यापासून दूर राहून हिंसा व शिकार न करता तो राहू शकतो हे त्याने प्रथम सिद्ध करावे, असा संकेत रूढ झाला. त्या काळच्या पुरुषाच्या ‘लाइफस्टाइल’नुसार त्याच्या पालकत्वाचे हे प्रशिक्षण म्हणायला पाहिजे. हे व्रत केल्यावर झालेले मूल सदोष निघाले किंवा मृत झाले तर त्याचा ठपका व्रत करणाऱ्या पुरुषावर येत असे. ज्या पुरुषाला असे पितृत्व हवे आहे त्याने पितृत्वभावनेशी वचनबद्ध असले पाहिजे, म्हणून वर वर्णन केलेल्या व्रताचे महत्त्व प्राचीन काळात होते.
म्हणजे इथे स्पष्ट आहे की, सामाजिक पितृत्वकल्पना येऊनही समाजाची प्राचीन मातृव्यवस्था कायमच राहिली. प्रत्येक स्त्रीची मुले या नेमलेल्या पित्याजवळ राहून सात-आठ वर्षांची होताच मामाच्या तालमीत येत होती. सामाजिक पितृत्वाची ही कल्पना सुमारे दोन-तीन हजार वर्षे टिकली. पण या कालावधीत जे एक सत्य उघडकीस आले, त्या सत्याने ही कल्पना उद्ध्वस्त केली. आतापर्यंत पुरुषापासून स्त्रीला मूल होते, इथपर्यंत मानवी समाज ज्ञानी झाला होता. पण हे मूल अनेक पुरुषांमुळे स्त्रीच्या उदरात तयार होते, अशी कल्पना होती. पण सामाजिक पितृत्व संस्कारामुळे पिता-पुरुषाचे, स्त्रीबरोबर सान्निध्य वाढले. त्यातून, एकाच पुरुषाच्या सततच्या स्त्री-सान्निध्याने स्त्रीला होणारे मूल, हे त्याच पुरुषाचे असते, हे ज्ञान या प्राचीन स्त्री-पुरुषांना प्राप्त झाले. हा कालखंड ८ ते १० हजार वर्षे दरम्यानचा असावा. अर्थात आपली मुले पुरुषाला स्पष्टपणे ओळखता येऊ लागली. त्यामुळे त्यांचा स्वत:च्या मुलांचे हित पाहण्याकडे कल होऊ लागला आणि बहिणीच्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यातून मातृकुळात मामा-भाचे तंटे सुरू झाले. भाऊ-बहिणीचे संबंध बिघडले. बहिणीची मुले व भावाची मुले असे आते-मामे भावंडांत संघर्ष सुरू होऊन त्याची परिणती हिंसेमध्ये होऊ लागली.
पुरुषाला पितृत्वादाखल अधिकार हवे होते, पण हजारो वर्षे लाभलेले भावाचे अधिकारही, त्या संस्कारामुळे, सोडून देण्याची त्याची मानसिकता तयार झालेली नव्हती. परंतु दोन्ही अधिकार एकाच वेळेस पुरुषास प्राप्त होणे, हे व्यवहारात अडचणीचे होत होते. त्यामुळे तत्कालीन समाजाची बंधुप्रधान आणि पितृप्रधान अशा दोन गटांत सरळ विभागणी झाली. मातृप्राधान्य बाजूलाच राहिले. माझ्या मते, याच कालखंडापासून मातांची मातृकुळावरील पकड सैल झाली. माता व बहिणींचा प्रभाव कमी होत गेला, कारण इथे भांडण हे पुरुषांच्या दोन अधिकारातलं होतं आणि पुरुष काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं झालं. स्त्रीच्या निर्णयाला अर्थ राहिला नाही.
पुरुषाने बंधुप्रधानकी किंवा पितृप्रधानकी यापैकी एक काहीतरी मान्य करण्याने समाजात शांतता नांदणार होती. तेव्हा काही संस्कृतींनी त्याकरिता क्रूर प्रथा स्वीकारल्या. ज्या पुरुषाला पितृप्रधानकी मान्य आहे, त्याने बंधुप्राधान्य सोडले हे सिद्ध करण्यास, बहिणीचा पहिला मुलगा बळी द्यायचा आणि त्याउलट बंधुप्रधानकी मान्य करणाऱ्या पुरुषाने पितृप्रधानकी सोडली हे दाखविण्याकरिता पत्नी-स्त्रीचा पहिला मुलगा ठार करायचा. या प्रथेमुळे मातृकुळात हाहाकार उडाला. प्रत्येक स्त्री ही कुणाची बहीण किंवा पत्नी-स्त्री होतीच. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचे अपत्य बळी जाऊ लागले. कालांतराने पशुबळीची कल्पना स्वीकारली जाऊन हे प्रकार थांबवण्यात आले.
बंधुप्राधान्य विरुद्ध पितृप्राधान्य हा झगडा म्हणजे मातृसंस्कृती विरुद्ध पितृसंस्कृती अशाच एका अर्थाने तो संस्कृती संघर्ष होता. हा संस्कृती संघर्ष पुढील काही हजार वर्षे चाललेला होता. भारतात तर तो आर्य आल्यानंतरही चालू होता.
मध्यंतरीच्या काळात नांगराचा शोध सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी लागला. या नव्या तांत्रिक बदलाने संपूर्ण समाजव्यवस्था नंतरच्या तीन हजार वर्षांत पूर्णत: उलटी फिरवली. नांगर या अवजड साधनामुळे शेती करण्याचे काम पूर्वी स्त्रियांकडे होते, ते पुरुषांकडे आले. पुरुष जमिनी जिंकून आणण्याचे काम प्राचीन काळापासून करीत होते. नांगरामुळे जास्त जमीन लागवडीखाली येऊन भरपूर धान्य निर्माण होऊन धान्यसाठे निर्माण झाले. शेती उद्योग इतर उद्योगांना ‘किरकोळ’ करून पुढे गेला आणि जमीनदारी उदयास आली. जमीन जिंकून आणणारे आणि ती कसणारेही पुरुष, म्हणून जमीनदारांना शेती उत्पादन आणि जमीन पुढे सांभाळणारा स्वत:चा वारस मुलगा हवा, असे स्वाभाविकपणे वाटू लागले. म्हणून विशेषत: जमीनदार व राज्यकर्त्यांनी रीती, रिवाज, परंपरा निर्माण करून स्त्रियांनी एकाच पुरुषाशी शरीरसंबंध करण्याचे बंधन आणले, तीच विवाहप्रथा होय! साम, दाम, दंड व भेद असे विविध प्रकार वापरून सत्ताधारी पुरुषांनी स्त्री-समाजावर विवाहाची सक्ती लादली. ही विवाह प्रथा राजघराण्यातून झिरपत सामान्य जनतेतही रूढ झाली.
थोडक्यात, गेल्या सुमारे ५० हजार वर्षांत, शरीरसंबंधाच्या प्रस्तुत पद्धती म्हणजे पुरुषाला मातृकुळात सामावून घेण्याचे, त्याला माणूस म्हणून घडविण्याचे मातांनी केलेले प्रयत्न म्हणावे लागतात. पुरुषाने क्रूर जंगली जीवनातून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, नातेसंबंधाशी तो भावनिक समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले.
आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहातही आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले आणि गेली  ३-४ हजार वर्षे, पुरुषाचे हित सांभाळण्यासाठी, पतीगृहात पती देईल ते स्थान पत्करून त्या आपला जीव वेचीत राहिल्या, ही आजची वस्तुस्थिती आहे. 
‘विवाह’ हा नेहमीच मला पुरुषाचा प्रश्न वाटला. तो स्त्रीचा प्रश्न कधीही नव्हता आणि आजही नाही. आणि हा अभ्यास केल्यावर मात्र विवाह म्हणजे ‘पुरुष जन्मा ही तुझी कहाणी’ असे म्हणावेसे वाटले.
मार्गारेट मीड या संशोधिकेने आपल्या १९४९ साली लिहिलेल्या Male and Female या पुस्तकात वेगळ्या शब्दात हेच मांडलेले आढळते. ती म्हणते, ‘पुरुषाला नक्की कोणती भूमिका द्यावी, ही प्रत्येक समाजाची कायमच मध्यवर्ती समस्या राहिली.’

Monday, December 13, 2010

विश्वाचे प्रसरण - १

जर आपण चन्द्र नसलेल्या म्हणजेच आमवसेच्या रात्री आकाशाकडे बघितले तर आपल्याला शुक्र,मंगळ,गुरु आणि शनि हे तारे प्रखरतेने लखलखताना दिसतात. आपल्या आकाशगंगेत लाखो करोड़ो तारे आहेत जे आपल्या सूर्यासारखे आहेत पण ते आपल्यापासून खुप दूर आहेत. त्यातील काही तारे आपली जागा बदलताना दिसतात,असे का होते कारण जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा आपण विविध जागांवरुण त्यांच्याकडे पाहतो आणि ते आपल्याला जागा बदलताना दिसतात.तारा जितका आपल्याला जवळ असेल तो तितका जास्त जगा बदलताना आपल्याला दिसतो. प्रोक्सिमा सेंचुरी तारा हा ४ प्रकाशवर्ष इतका दूर आहे ( १ प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशकिरण एका वर्षात जितक्या दूर जातात ते अंतर होय). आणि आपला सुर्य आपल्या पासून केवल काही प्रकाश मिनिटे दूर आहे. जे काही तारे आपण उघड्या डोळ्यानी पाहतो ते आपल्याला संपूर्ण अकाशभर पसरलेले दिसतात पण ते एका पट्ट्यात आहेत आणि त्या पट्ट्याला आपण आकाशगंगा असे म्हणतो.

इ स १९७० च्या पुर्विपर्यंत बरेच खगोलशास्त्रज्ञ असे मानत की जे काही तारे आपल्याला दिसतात ते एका चकती प्रमाने असणार्या एका आकारात बद्ध असावेत, त्यालाच आपण आज स्पायरल ग्यालाक्सी (spiral Galaxy ) असे म्हणतो.
  १९२४  पर्यंत एकच आकाशगंगा आहे असे मानले जात होते,परंतु नंतर अमेरिकन शास्त्रज्ञ एडविन हबल यांनी सांगितले की आपली आकाशगंगा इकटी  नाही. तिच्यासारख्या अजुन खुप सार्या आकाशगंगा अंतराळात आहेत, आणि त्यामधे अंतर( पोकळी )  आहे.  हबल यांनी त्यांचे म्हनने पटवून देण्यासाठी अंतर मोजन्याच्या काही किचकट पध्हती चा वापर केला. त्यानी ९ आकाशगंगा चे अंतर मोजुन दाखवले

आपण ज्या आकाशगंगेत राहतो ती १००,००० प्रकाशवर्ष एवढे अंतर पसरलेली आहे. आणि ती स्वताच्या अक्षाभोवती फिरते. तिच्या फिरत्या बाजूमध्ये (spiral arms ) असणारे तारे तिच्या  अक्षाभोवती फिरतात. त्यांना एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी काही १०० दश लक्ष वर्ष लागतात
आपला सूर्य हा आपल्या आकाशगंगेतला एक साधारण,मध्यम आकाराचा पिवळा असा तारा आहे.
हे सर्व तारे आपल्यापासून खूप दूर आहेत, इतके कि ते आपल्याला एका प्रकाशाच्या बिंदू सारखे दिसतात मग असे असून सुद्धा आपण त्यांचे अंतर कसे सांगू शकतो?  तार्या पासून निघणार्या प्रकाशाच्या रंगावरून याचा अंदाज  लावता येतो. विज्ञानं
न्यूटनला असे आढळून आले एखाद्या त्रिकोणी काचेच्या तुकड्या (प्रीस्म)  वर सूर्याचा प्रकाश पडला तर त्याचे विभाजन विविध रंगामध्ये होते (ज्याप्रमाणे आपण इंद्रधनुष्यात रंग पाहतो त्या प्रमाणे). त्याला स्पेक्ट्रम असे म्हणतो. जर आपण मोठ्या दुर्बिणीतून आकाशाकडे बघितले
तर आपण तार्याचा प्रकाश स्पेक्ट्रम बघू शकतो. प्रत्येक तार्याला त्याचा स्वताचा स्पेक्ट्रम आहे. एखाद्या तप्त तर्याकातून निघणारा प्रकाश किवा स्पेक्ट्रम त्या तार्याच्या तापमानावर अवलंबून असतो  म्हणजेच दोन तार्यांच्या स्पेक्ट्रम वरून आपण एखाद्या तार्यावर किती तापमान आहे हे सांगू शकतो. तसेच आपणास माहित आहे कि रासायनिक पदार्थामध्ये एक विशिष्ट रंग शोषून घेण्याची क्षमता असते म्हणजेच एखाद्या तार्यापासून येणाऱ्या स्पेक्ट्रम मध्ये नसलेल्या रंगावरून एखाद्या तार्यावर असणाऱ्या रासायनिक पदार्थांची माहिती आपण मिळवू शकतो.

Sunday, December 12, 2010

प्रकाशाच्या वेगाने आपण का प्रवास करू शकत नाही ?

१९०५ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनने प्रकाशाच्या वेगासंबंधीचा स्थिर सिद्धांत त्याच्या 'मर्यादित सापेक्षता' सिद्धान्तामध्ये मांडला. आईन्स्टाईनने या सिद्धान्तामध्ये असे मत मांडले की प्रकाशाचा वेग कुठल्याही स्थितीमध्ये सारखाच म्हणजे ३ * १० ^ ८ मी. /सें. एवढा असतो. दुसर्‍या शब्दामध्ये सांगायचे तर प्रकाशाचा वेग कुठल्याही निरीक्षकासाठी मग तो स्थिर नसलातरी त्याच्यासाठी व प्रकाशाच्या स्रोतासाठी सारखाच असतो.

हे समजण्यासाठी एक उदाहरण घेउ. कल्पना करा कि तुम्ही एका कारने १०० कि.मी. वेगाने प्रवास करत आहात.तुमच्या बाजुने तुमच्याएवढ्या वेगाने जानारी वाहने तुम्हाला स्थिर जाणवतात. तसेच तुमच्यापेक्षा कमी वेगाने जानारी वाहने मागे पडत जातात.पण प्रकशाच्या बाबतीत असे नाही. जर तुम्ही प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असाल आणि तुमच्या बाजुने एखादा प्रकाश झोत प्रवास करत असेल तर तो तुम्हाला स्थिर जाणवत नाही. उलटपक्षी तो त्याच वेगाने तुमच्या पुढे निघुन जाइल.(म्हनजेच प्रकाशाला overtake करणे शक्य नाही). म्हणजेच प्रकाशाचा वेग हा स्थिर निरीक्षक (static frame observer) आणि चल निरीक्षक(moving frame observer) दोघांसाठी सारखाच असतो (there is no relative speed for light)

प्रकाशाचा वेग हा 'प्रकाशाने किती अंतर पार केले' याला भागिले 'त्याला यासाठी एकूण किती वेळ लागला'

वेग = अंतर / काळ

 या समीकरणाने केले जाते. एक स्थिर सिद्धांत मांडण्यासाठी आईन्स्टाईनने वेगाच्या व्याख्येमध्ये असलेल्या अंतर आणि काळ यांच्या मूळ कल्पना बदलल्या. त्याने असे सांगितले की अंतर आणि काळ यांच्यामध्ये आपणास असे गृहीत धरले पाहिजे की कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगापेक्षा जलद जाऊ शकत नाही ही गोष्ट कळण्यासाठी त्याने मर्यादित सापेक्षता सिद्धान्तामध्ये ( Special Relativity Theory) असे मत मांडले की एखाद्या गोष्टीचे वस्तुमान हे त्या गोष्टीच्या वेगाप्रमाणे वाढते. जेव्हा एखादी गोष्ट प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असेल तेव्हा तिचे वस्तुमान अनंत होते, म्हणजेच प्रचंड वेगाने प्रवास प्रवास करण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज असते.  सध्यातरी असला प्रचंड शक्तीचा स्रोत उपलब्ध नाही. म्हणून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करने अशक्य आहे.

आतापर्यंत अतिसूक्ष्म भौतिकशास्त्राच्या ( Particle Physics) प्रयोगामध्ये वेगाप्रमाणे बदलणारे वस्तुमान खूप वेळा पडताळले आहे. प्रकाशाचे कण ( Photons of lights) यांना वस्तुमान नसल्याने ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.

Friday, December 10, 2010

दोन दिवस वाट पाहण्यात गेले


दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.


कवी - नारायण सुर्वे

Wednesday, December 8, 2010

कृष्णविवर म्हणजे काय ?

कृष्णविवाराची उत्पत्ति कशी होते हे जाणून  घेण्यासाठी सर्वप्रथम एक मोठ्या तार्‍याचा जीवनक्रम कसा असतो याची माहिती आपण घेवुयात.


प्रचंड प्रमाणात हायड्रोजन वायु स्वताच्याच गुरुत्वबलामुळे आतल्या बाजुस कोसळन्यास सुरवात होते तेव्हा एका तार्‍याची निर्मिती होते. जसजसा हळूहळू हा वायु  आंकुचन पावतो तसतसे त्यामधले अणु एकमेकावर आदळले जातात आणि त्यांची एकमेकांवर आदळण्याची  वारंवारता आणि गती वाढत जाते आणि उष्णता निर्माण होते. ही उष्णता प्रचंड असते त्यामुळे वायुचे  तापमान वाढते आणि एका ठराविक मर्यादेला अणु एकमेकावर आदळून परत न फिरता त्यांचे हेलियमच्या अणु मधे रूपांतर होते.
 या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते आणि त्यामुळे तारा चमकताना दिसतो. या सर्व प्रक्रियेत अजुन एक गोष्ट घडते ती म्हणजे जी काही अतिरिक्त उर्जा निर्माण होते ती तार्‍याला आत कोसळवणार्‍या गुरुत्व बलाला विरोध करते आणि तारा आत कोसळन्याचे थांबतो. जसे एखाद्या फुग्यामाधे आतील हवेचा दाब (जो फुग्याला आतून बाहेर फुगवन्याचा प्रयत्न करतो )  आणि त्याच्या रबरामुळे निर्माण झालेला बाहेरील दाब ( जो फुग्याला लहान करण्याचा प्रयत्न करतो ) यामधे संतुलन असते तसेच काहीसे इथे होते आणि तारा संतुलित अवस्थेत येतो.

या प्रमाने तारा दीर्घ कालपर्यंत संतुलित अवस्थेत  राहतो. जेव्हा तार्‍यातिल हायड्रोजन संपत येतो तेव्हा हायड्रोजन चे हेलियम मधे रूपांतर होण्याचे प्रमाण कमी होते आणि तार्‍याला संतुलित राहण्यासाठी जी उर्जा आवश्यक असते ती अपुरी पडू लागते. जेव्हा हायड्रोजन पूर्ण संपतो तेव्हा ही उर्जा निर्माण होत नाही,तारा थंड होऊ लागतो आणि तार्‍याला आत खेचानारे गुरुत्वबल प्रभावी होऊ लागते. तारा जसाजसा छोटा होत जातो तसतसे त्याच्या पृष्टभागाचे गुरुत्वबल वाढत जाते आणि  एका निश्चित त्रिजेला ते इतके प्रचंड होते की तार्‍याचा प्रकाश सुध्धा त्यातून बाहेर पड़ने अशक्य होते. इतकेच नव्हे तर या तार्‍या जवळून
जाणारे प्रकाश किरण सुध्धा तार्‍याच्या गुरुत्व बलामुळे आत खेचले जातात.


सापेक्षतवादाच्या सिध्धांतानुसार कोणतीही वस्तु  प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नाही, याचा अर्थ असा की  जर प्रकाश या तार्‍यामधून बाहेर जाऊ शकत नाही म्हणजेच दुसरे काहीही अशा तार्याच्या पृष्टभागाहुन बाहेर जाऊ शकत नाही.


अशा या तार्‍याना कृष्णविवर असे म्हणतात.

उडत्या तबकड्या -2

दैनिक सकाळ - बुधवार दिनांक ५ सप्टेंबर २००७
उडत्या तबकड्या - अंतराळ युगातील अंधश्रद्धा
(जयंत नारळीकर)


अधूनमधून वृत्तपत्रांत बातमी येते, की अमुक अमुक ठिकाणी तमुक व्यक्तीला आकाशात फिरणारी प्रकाशवान वस्तू दिसली, जिची नीट ओळख पटू शकली नाही. "ती वस्तू काही काळ दिसली, मग अदृश्‍य झाली' अशा बातमीपासून "त्या वस्तूतून काही परकीय जीव आले' अशांसारखी विधाने पाहणाऱ्याने केलेली असतात.
सामान्यपणे आकाशात "उडणारी' अपरिचित वस्तू किंवा "अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्‍ट्‌स' ("यूएफओ') म्हणजे परकीय जीवसृष्टीकडून आलेले यान, हा समज एक अंधश्रद्धेचाच प्रकार समजावा.
याला सुरवात झाली २४ जून १९४७ रोजी! केनेथ आर्नोल्ड हा एक व्यापारी स्वतःचे विमान चालवत जात असताना वॉशिंग्टन राज्यात माऊंट शेनियरजवळ त्याला बश्‍यांच्या आकाराची याने माळेच्या रूपात उत्तरेकडून दक्षिणेकडे उडत जाताना दिसली. वृत्तपत्रांना त्याने ही माहिती दिल्यावर तेथे तिला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. उडत्या तबकड्या (फ्लाइंग सॉसर्स) ही संज्ञा तेथूनच जन्माला आली.
आर्नोल्डच्या वक्तव्यानंतर "आम्हाला अमुकतमुक विचित्र गोष्ट उडताना दिसली', असे सांगणारे इतर अनेक लोक वेळोवेळी पुढे आले. पुढे पुढे अशी विधाने केली जाऊ लागली, "परकीय जीवांची याने पृथ्वीवर येत असतात... अमेरिकी वायुसेनेला त्यांची माहिती आहे; पण ते ती गुप्त ठेवतात... वायुसेनेच्या आणि सीआयएच्या लेखागारात ही गुप्त माहिती आहे, इत्यादी इत्यादी.' अखेर या वक्तव्यांना आवर घालण्यासाठी वायुसेनेने चौकशी समित्या वेळोवेळी स्थापन केल्या. त्यांना प्रकल्प साइन (१९४८), प्रकल्प ग्रज (१९४९) आणि प्रकल्प ब्लू बुक (१९५२-६९) अशी नावे दिली. त्या सर्वांचे निष्कर्ष होते, की उडत्या तबकड्यांचा देशाला कसलाही धोका नाही. त्या दृष्टिभ्रम किंवा चुकीचे निष्कर्ष किंवा जाणूनबुजून दिलेल्या खोट्या वृत्तान्तावर अवलंबून असतात, असे दिसून आले. कोणी "यू.एफ.ओ.' पाहिल्याचा दावा केला, म्हणजे त्याचा अर्थ सकृद्दर्शनी त्याला ओळखता आली नाही अशी वस्तू त्याने आकाशात पाहिली, असा होतो. हा दावा खरा मानला, तर ती वस्तू काय असू शकेल? काही पर्याय असे आहेत -
शुक्र ग्रह कधी कधी सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी क्षितिजाजवळ असतो. अशा वेळी तो झाडा/घराआडून डोकावताना दिसतो. मोटारसायकलवरून जाणारा माणूस तिकडे पाहत असेल, तर त्याला असे जाणवेल, की तो आपला पाठलाग करतोय! अशा वेळी "उडती तबकडी' आपल्याशी शिवाशीव करती होती, असे वाहनचालकाला वाटते. केनेथ आर्नोल्डला दिसलेल्या "तबकड्या' दृष्टिभ्रमाचा प्रकार असेल, असा वायुसेनेच्या तज्ज्ञांचा अंदाज होता. वाळवंटात तापमान उंचीप्रमाणे कमी होत जाते व त्याचा परिणाम मृगजळ दिसण्यात होतो. आर्नोल्डचे विमान साधारण ९५०० फुटांवरून जात होते. तेथे वातावरण स्वच्छ, निरभ्र होते. अशा स्थितीत तापमानाचा क्रम उलटल्यामुळे (वर वाढत गेल्याने) मृगजळ दिसते; पण आकाशात! वैमानिकांना याचा अनुभव येतो. हे थंड वातावरणात आकाशात दिसणारे मृगजळ.
अंतराळ युगाला सुरवात झाल्यापासून मानवनिर्मित उपग्रह मोठ्या संख्येने पृथ्वीभोवती फिरत आहेत. सूर्योदय व सूर्यास्त होत असताना ते प्रामुख्याने दिसू शकतात. ते "यूएफओ' म्हणून अनेकांनी पाहिलेले असतात. काही प्रकरणांत "यूएफओ'चा दावा करणारा, घटनेचा साक्षीदार हा मानसिक वैगुण्याने प्रभावित असा सापडला आहे. आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्याने रचलेली ही गोष्ट असते. कधी कधी ती इतकी स्वाभाविक असते, की सांगणाऱ्याला आपण लोणकढी ठेवून दिलीय, याची जाणीवही नसते आणि काही बाबींत तर आगाऊ योजना करून फसवण्याचे उपक्रम केले गेले. यामागे मानसिक कारण नसून, ही हकिगत रचण्यामागे धनलाभ व्हावा, हे उद्दिष्ट होते.
अशी एक घटना न्यू मेक्‍सिको राज्यात सोकोरोजवळ घडली. झामोरा नावाचा एक ट्रॅफिक पोलिसमन एका वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करत होता. अशा वेळी त्याला डोक्‍यावरून एक आकाशयान जाताना दिसले. आपला पाठलाग सोडून झामोरा त्या यानामागे लागला. जवळच एका टेकडीवर ते यान उतरले आणि स्थिरावले. त्यातून पांढरे कपडे घातलेल्या दोन व्यक्ती उतरल्या. झामोरा आपली गाडी थांबवून बाहेर आला आणि यानाच्या दिशेने चालू लागला. यानातल्या लोकांना काही मदत हवी आहे का ते विचारायला; पण त्या व्यक्ती यानात शिरल्या व यानातून धूर, आग आणि आवाज येऊ लागल्यावर घाबरून झामोरा आपल्या कारकडे पळाला. वाटेत त्याचा चष्मा खाली पडला. तो उचलून कारपर्यंत गेला तेव्हा ते यान निघण्याच्या तयारी होते. ते लवकरच आकाशाकडे झेपावले आणि नाहीसे झाले. पुढे यान जेथे उतरलेले झामोराने पाहिले तेथे यानाची "पदचिन्हे' दिसली.
झामोराची जबानी पुष्कळ वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. "यूएफओ' दिसले ती जागा पाहायला पुष्कळ पर्यटक आले, तेव्हा तिकडे जायला म्युनिसिपालिटीने पक्का रस्ता बांधला. शास्त्रज्ञांनीदेखील त्या जागांना भेटी दिल्या; पण झामोराने नक्की काय पाहिले यावर एकमत होऊ शकले नाही. पुढे फिलिप क्‍लास या पत्रकाराने याचा छडा लावला. झामोराच्या जबानीत पुष्कळ विसंगती दिसल्या. उदाहरणार्थ - टेकडीपासून जवळच एक शेतकरी राहत होता, त्याला यातले काहीच दिसले नाही. झामोराच्या वर्णनानुसार मोठा आवाज झाला तो त्याला ऐकू यायला पाहिजे होता, तसेच आगही दिसायला हवी होती; पण त्याने हे काहीच अनुभवले नव्हते. क्‍लासने आणखी एक पत्ता लावला. जेथे यान उतरल्याचा दावा झामोराने केला ती जागा, ती टेकडीच गावातल्या पौरांची होती. तेव्हा त्यांच्या जागेकडे पक्का रस्ता बांधायचे काम "यूएफओ'च्या निमित्ताने म्युनिसिपालिटीच्या खर्चाने झाले. अशा तऱ्हेने "यूएफओ' आले, गेले; पण फायदा मेयरसाहेबांना झाला.
क्‍लासने आपल्या पुस्तकात (शीर्षक ः यूएफओज एक्‍सप्लेन्ड ः "यूएफओ'ची कारणमीमांसा) अशा अनेक अनाकलनीय वाटणाऱ्या घटनांमागचे रहस्य उकलून दाखवले आहे. असे म्हणायला हरकत नाही, की आजवर अनेक यूएफओच्या घटनांची छाननी झाली; पण अद्याप परकीय जीव इथे येऊन गेले हे सिद्ध करणारी एकही घटना समोर आली नाही.
एक गोष्ट या संदर्भात नमूद करण्याजोगी आहे. आपल्याकडे वाहनांची दोन टोकाची उदाहरणे म्हणजे बैलगाडी आणि जेट विमान. यांत किती साम्य आहे? काहीच नाही. कारण जसे वाहनांचे तंत्रज्ञान बदलत जाते, त्यांचा आकारही बदलतो. याच नियमाप्रमाणे अंतराळात दूरदूरचे प्रवास करायचे तंत्रज्ञान आपल्या सध्याच्या चंद्रा-मंगळाकडे जाणाऱ्या यानांच्या तंत्रज्ञानापेक्षा पुष्कळ वेगळे असायला हवे; पण आजवर वेगवेगळी "यूएफओ' प्रेक्षकांनी "पाहिलेली' याने त्यांच्याच वर्णनानुसार आपल्या विमानांपेक्षा किंवा अंतराळ यानांपेक्षा फार वेगळी नाहीत. हे कसे संभवते? जर यूएफओ ही अनेक प्रकाशवर्षे अंतरांवरून अतिवेगाने इकडे आली, तर त्यांचे तंत्रज्ञान आणि आपले आजचे अंतराळ तंत्रज्ञान यात जमीन-अस्मानाचा निदान जेट विमान - बैलगाडीतला फरक असायला हवा! तेव्हा अशी शंका घ्यायला वाव आहे, की ज्या लोकांनी यूएफओ पाहिल्याचे दावे केलेत त्यांची कल्पनाशक्ती फार मोठी झेप घेऊ शकली नाही.
आणि "यूएफओ'ची छायाचित्रे पाहिल्याची उदाहरणे आहेत. छायाचित्रे खोटे बोलत नाहीत त्याचे काय? यावर क्‍लासच्या पुस्तकात एक खरा किस्सा आहे, तो पाहा. दोन शाळकरी मुलांनी यूएफओची छायाचित्रे स्थानिक वृत्तपत्रात छापली. ते यान दुरून जवळ येताना आणि मग लांब जाताना त्यांनी छायाचित्रित केले. छायाचित्रात गोल यान खिडक्‍यांसकट होते. काही काळ शास्त्रज्ञदेखील चक्रावले; पण अखेरीस छायाचित्रांच्या निगेटिव्ह्‌जवरील क्रमांक वेगळाच क्रम दाखवत होते. मग विशेष उपकरणे वापरून छायाचित्रांची तपासणी केली तेव्हा रहस्य उलगडले. कार्डबोर्डचे मॉडेल बारीक निळ्या सुताने झाडाच्या फांदीला टांगून निळ्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर फोटो घेतले होते. त्यांत सूत दिसत नव्हते.
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)
"यूएफओ' आणि "परकीय जीव'

ती एकदा आजीला म्हणाली

ती एकदा आजीला म्हणाली 
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं.......


मज्जा

असे म्हंटले की हसू येऊ शकणारे काही निर्व्याज जीव अजूनही भूतलावर तरंगताना आढळतात.

आता हसण्याचे विविध फायदे पाहू.

१. हसण्यामुळे हसता येते हे सिद्ध होते.

२. हसण्यामुळे पोट गदागदा हालल्यामुळे पचनसंस्था ऍक्टिव्हेट होते.

३. हासणे हे 'हसावेसे वाटणे' या भावनेचे व्यक्तीकरण आहे. 'हसावेसे वाटणे' हे माणसाला 'मजा' वाटल्यावर होत असल्यामुळे 'हासणे' हे काही ना काहीतरी मजा झाल्याचे द्योतक असू शकते.

४. हासण्यामुळे दात दिसत असल्यामुळे दातांची निगा राखावी अशी इच्छा नैसर्गीकपणे होण्याची शक्यता असल्यामुळे 'ती निगा राखली जाणे', 'पेस्टचे कारखाने चालणे', 'ब्रशचे कारखाने चालणे', 'त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळणे' वगैरे गोष्टी आपोआप होतात.

५. हासणे ही एक नैसर्गीक क्रिया असल्यामुळे निसर्गमित्र असल्याची भावना जागृत होणे शक्य होते.

६. हासणे हे मानवाच्या माहितीप्रमाणे फक्त मानव करू शकत असल्यामुळे 'आपण मानव आहोत' याची खात्री पटण्यास मदत होते.

७. हासताना आपल्या नियंत्रणात नसणारे आवाज आल्यामुळे 'आपण असेही आवाज ( तोंडातून ) काढू शकतो' यावर विश्वास बसून माणसाला आपल्या काही सुप्त क्षमतांची जाणीव होते.

Tuesday, December 7, 2010

सुनामी लाटांमध्ये सापडली उडती तबकडी?
    
सुनामी लाटांनी घडवून आणलेल्या महाप्रलयातून सावरण्याचा प्रयत्न या लाटांचा तडाखा बसलेले देश करीत असतानाच या सुनामी आपत्तीतून काही नवनवीन माहिती हाती येत आहे. जगात अधूनमधून उडत्या तबकड्यांची (अनआयडेंटीफाय फ्लाइंग ऑब्जेक्ट) चर्चा चालू असते. पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीविषयी नेहमीच कुतूहल असते. त्यामुळे वर परग्रहांवरून पृथ्वी येऊन गेलेल्या कथित उडत्या तबकड्यांची चर्चा तिखटमीठ लावून होत असते. सुनामी-प्रलयानंतर अशीच एक सनसनाटी बातमी ‘वीकली वर्ल्ड न्यूज‘च्या वेबसाइटवर दिसून आली. सुनामी लाटांच्या तडाख्यानंतर मदतकार्यासाठी गेलेल्या थायलंडच्या मदतपथकास हाँग बेटाच्या किनारपट्टीवर वाळूत रुतून बसलेली एक प्रचंड उडती तबकडी आढळली. ही ९० फूट व्यासाची तबकडी वाळूमध्ये अर्धी रुतून बसली होती. थायलंडच्या पोलिसांनी आणि अन्य अधिकार्‍यांनी त्या गूढ वस्तूविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातून त्यांना आणखी आश्चर्यकारक माहिती मिळाली. काय होती ती माहिती?
थायलंडचे अधिकारी त्या उडत्या तबकडीत गेले असता त्यांना परग्रहावरील दोघांचे पार्थिव त्यात आढळून आले. उडत्या तबकडीच्या कॉकपिटमध्ये या दोघांची प्रेते त्यांना आढळली. पण त्याही पुढे आणखी आश्चर्य वाटण्यासारखे दृश्य त्या लोकांना दिसले. तबकडीतील एका जलप्रतिबंधक खोलीत एका थायी महिलेस जखडून ठेवले होते. २७ वर्षे वयाच्या त्या महिलेचे नाव वेन्डी कार्प्सडेल असे असून, तिचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. परग्रहावरील मंडळींनी पृथ्वीवरील मानवावर संशोधन करण्यासाठी वेन्डीला सदर खोलीत जखडून ठेवल्याचा तर्क व्यक्त करण्यात आला आहे. उडत्या तबकडीतील वेन्डीला नंतर वैद्यकीय उपचारासाठी तेथून बँकॉकला हलविण्यात आल्याची माहितीही संबंधित वृत्तान्त देण्यात आली आहे. ती उडती तबकडी थायलंड परिसरात कशी आली, त्यातील लोकांनी वेल्डीचे अपहरण कधी केले, सुनामी लाटांच्या तडाख्यात सदर तबकडी कशी सापडली, परग्रहावरून येण्याइतके प्रगत तंत्रज्ञान ज्यांच्याजवळ आहे त्यांचे यान सुनामी लाटांच्या तडाख्यात कसे काय सापडले, अशा तुम्हा-आम्हाला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे मात्र संबंधितांकडून उपलब्ध होऊ शकली नाहीत. थायलंडचे सरकार या घटनेबाबत अत्यंत गुप्तता पाळत असून, दुजोरा देण्याबाबतही त्या सरकारची ‘अळीमिळी गुपचिळी‘ आहे. सदर तबकडी रडार यंत्रणेला चुकविण्यासाठी अत्यंत खालून उडत असावी आणि त्यामुळे ती सुनामी तडाख्यात सापडली असावी, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे तर सदर यान पाण्याखालीही प्रवास करण्याची क्षमता असल्याचे असावे आणि सुनामी लाटांमुळे त्या यानाची अशी अवस्था झाली असावी, असे काहींचे म्हणणे. थायी किनार्‍यावर आढळलेल्या त्या यानात प्रवेश करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. लेसर किरणांचा वापर करून त्या तबकडीचे झाकण उघडण्यात आले. आतमध्ये प्रवेश केल्यावर प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे त्या यानात लोक आढळले. थायलंडच्या कोह लाओ ला डिंग समुद्रकिनार्‍यावर ६ जानेवारी २००५ रोजी आढळलेले ९० फूट व्यासाचे यान म्हणजे खरोखरच परग्रहावरून आलेली एखादी उडती तबकडी होती की अन्य एखादे यान होते की हा सर्वच प्रकार ‘फोकनाड‘ आहे, याचे गूढ कधी उलगडेल हे मात्र सांगता येणार नाही. पण सुनामी-प्रलयाच्या पार्श्वभूमीवर या उडत्या तबकडीची चर्चा ‘नेटकरां‘मध्ये चालू आहे, हे यानिमित्ताने जगासमोर आले आहे.