Powered By Blogger

Friday, December 17, 2010

सुर्यमाला किती वर्षात आकाशगंगेची एक फेरी पुर्ण करते ?

सर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. पण त्यापैकी बहुतांश तारे आपण पाहू शकत नाही. रात्रीच्या अवकाशामध्ये दिसणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेतील आहेत. साधारण १, ००, ००० (१ लाख) प्रकाशवर्षे व्यास असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रापासून जवळपास २६, ००० प्रकाशवर्षे आपली सूर्यमाला आकाशगंगे भोवती फिरते आहे. खरेतर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या बळावर त्याच्या भोवती फिरणार्‍या ग्रहमालेला घेऊन प्रती सेकंद २७० कि. मी. या वेगाने २० कोटी वर्षांमध्ये आकाशगंगेभोवती एक फेरी पूर्ण करतो. आतापर्यंत आपल्या सूर्याने आकाशगंगेच्या २० फेर्‍या पूर्ण केल्या आहेत.
  

No comments:

Post a Comment