Powered By Blogger

Tuesday, December 28, 2010

3G म्हणजे ?

मोबाईल फोन ही संकल्पना १९४६ पासून व्यवहारात आहे. लष्करी कारणांसाठी सुरू झालेला "मोबाईल फोन' सत्तरच्या दशकात मोटारीमध्ये वापरला जाऊ लागला. त्यामध्ये जपानी बनावटीच्या मोटारी आघाडीवर होत्या. या "मोबाईल फोन'ला "वन जी' (फर्स्ट जनरेशन) मानले जाते. "जी' म्हणजे जनरेशन. ही मोबाईल फोनची "पहिली पिढी' मानली गेली. केवळ बोलण्यासाठी या फोनचा वापर होत होता.

नव्वदच्या दशकानंतर तंत्रज्ञानात झपाट्याने झालेल्या बदलाचा परिणाम म्हणजे "टू जी' (सेकंड जनरेशन). नोकिया या जगातील अव्वल मोबाईल कंपनीचे मुख्यालय ज्या देशात आहे, त्या फिनलंडमध्ये "टू जी' मोबाईल फोनद्वारे प्रथमच "एसएमएस' पाठविता येऊ शकले. त्यापाठोपाठ मोबाईलवरून इंटरनेट मिळविणे, एकाच वेळी अनेकांशी संभाषण करता येणे, आवडीप्रमाणे हॅण्डसेटमधील ऍप्लिकेशन्स वापरणे आदी सुविधा "टू जी'मध्ये मिळाल्या.
आता आला आहे, "थ्री जी' (थ्री जी किंवा थर्ड जनरेशन) मोबाईल फोन. "वन जी' आणि "टू जी'मधील सर्व सुविधा तर त्यात आहेतच; शिवाय त्यामध्ये असलेले दोषही दूर केले गेले आहेत. "थ्री जी' मोबाईल म्हणजे खिशातून बाळगता येईल, असे ऑफिस आणि थिएटर! "टू जी' मोबाईलमध्ये विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे इंटरनेट सेवा वेगवान करता येत नव्हती. "थ्री जी'मध्ये हीच सेवा घरी ३.१ एबीपीएस (मेगाबाईट प्रति सेकंद = १०,००,००० बिट्‌स प्रति सेकंद) इतक्‍या किंवा त्याहीपेक्षा अधिक वेगाने मिळू शकते. साहजिकच, मोबाईल फोनवरून घरच्या किंवा ऑफिसमधील इंटरनेटच्या वेगाने संवाद साधणे शक्‍य होते इंटरनेटवरून सध्या ज्याप्रमाणे टीव्ही "लाइव्ह' दिसतो, तसा मोबाईलवरूनही पाहता येतो

"टू जी'मध्ये एकाच वेळी अनेक मोबाईलधारकांशी (टेलिकॉन्फरन्सिंग) संवाद साधता येत होता, तो "थ्री जी'मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून साधता येईल. आरोग्यसेवा पुरविण्यासाठी खूप उपयुक्तपणे हे "व्हिडिओ कॉन्फरन्सिंग' वापरता येऊ शकेल.

या शिवाय आपल्याला हव्या त्या परिसराची ताजी माहिती (म्हणजे डिजिटल फॉर्ममध्ये तयार असलेलीच!) उदा. वाहतूक, हवामान आदींची, तत्काळ मिळू शकेल. मोबाईल ऑपरेटरकडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओ-ऑडिओमधून हवा तो, ग्राहकाला मागवून घेता येईल.

-  इसकाळ मधील लेख

No comments:

Post a Comment