Powered By Blogger

Sunday, January 9, 2011

या माणसांना

या माणसांना
दाखवलीत का माणुसकी कधी तुम्ही?

जे तुडवतात रोज
भावना अनेकांच्या
आणि फसवून दुसर्यांना
हसतात वर पुन्हा

कापतात गळे पैशासाठी
आणि
राजकारणाच्या नावाखाली
भंगवतात समाजमुल्ये
जे खिदळतात मुक्तपणे प्रेतयात्रेत
समारंभात आल्यासारखे

जे समजतात मेलाय देव आपला
पण,
दिसत नाही सावली
गर्दीत दबलेली

कधी दाखवलीत का माणुसकी तुम्ही असल्या लोकांना?

लोक जे घेऊ पाहतात
कवडी मोलात सोनं
स्वत:ला  कर्ण म्हणवण्यासाठी
फिरतात दान करत पापाचं

सांगतात आपल्याच चुका
पुन्हा पुन्हा अभिमानाने
छाती फुगवून
जे उजळतात फक्त दिवसा
चढवतात मुखवट्यावर मुखवटे
रात्री होतात मग्न विषयभोगात

स्वत:ला देव म्हणत
बाबा बनून फिरणारे

कधी दाखवलीत का माणुसकी तुम्ही
असल्या हृदयशुन्यांना?
- मी

No comments:

Post a Comment