मनात आहे तुझ्यासुद्धा
मग का अशी घाबरतेस
चेहऱ्यावर शून्यता आणून
का मग,
अंगठ्याने जमीन उकरतेस
गुप्त त्या भावना तुझ्या
का मला समजत नाहीत!
जबरदस्तीच्या लाजेमागाची
विकलता का मला समजत नाही!
व्यक्त करतो मी जेव्हा
सांग तुला काय होते?
गोल गुबर्या गालांवर सांग
का मग लाली येते?
एकदा तरी प्रयत्न कर
मला थोडं समजण्याचा
उत्तुंग प्रेम तुझ्यासाठी
डोळ्यात माझ्या शोधण्याचा ..
-मी

Awesome kavita lihitos yaar tu...
ReplyDeleteI became a fan of u buddy...