घर असते दोघांचे
उगाच असे समजलो
सावलीत नाही तुझ्यासाठी
उन्हातही झुरलो
आज घर शांत
आज मीही शांत
दारावरल्या पडद्यांना
आशा उगाच जीवंत
बडबडलो मी भीतींशी
बडबडलो उंबरठ्याशी
म्हटलं,
ते समाजातील माझी भाषा
तू येण्याची त्यांना मात्र
उगाच वेडी आशा
आता तुझ्या निरोपाला
बरीच वर्ष सरली
उरली आता फक्त आठवण
आसवं ओघळलेली..
- मी

No comments:
Post a Comment