Powered By Blogger

Wednesday, January 12, 2011

भविष्याबद्दल थोडेसे - १

अरीस्टोटल महान विचारवंत याचा असा विश्वास होता कि विश्व हे अनंत आहे.त्याने असे दाखवून दिले कि नैसर्गिक आपत्ती जसे महापूर, भूकंप इ. सभ्यaristotतेला पुन्हा सुरु करतात(पहिल्यापासून). विश्व हे अनंत आहे आणि त्या काळी या सर्व गोष्टी एक अज्ञात शक्ती च्या आधीन आहेत असे मानले जाई.
विश्वाला सुरवात असेल असे जर आपण मानले तर एक प्रश्न नक्की निर्माण होतो तो म्हणजे, सुरवातीच्या अगोदर काय घडले असावे? विश्व निर्मितीच्या अगोदर देव काय करत होता?  जे लोक असे प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी तो नर्कलोक तर तयार करत नव्हता ना?(हा हा ).जर असे असेल तर मग वेळेची सुरवात कशी झाली? काळ हा पूर्वीपासून अनंत होता कि तो विश्वाबरोबर सुरु झाला? जर्मन शास्रज्ञ इमानुअल कान्ट यांच्या मते जर विश्वाला सुरवात असेल तर त्याची सुरवात व्हयला अनंत काळ का लागला तसेच जर विश्व अनंत असेल तर मग त्याला या स्थितीत यायला अनंत काळ का लागला?
म्हणजेच काळ हा अनंत आहे. अनंत भूतकाळापासून चालू आहे आणि अनंत भाविष्यापर्यंत चालू राहील.मग विश्व असो व नसो काळ हा अनंत आहे. आजही हि कन्सेप्ट बरेच शास्रज्ञ मानतात.

परंतु काळ हा अनंत आहे हि संकल्पना १९०५ मध्ये संपुष्टात आली, जेव्हा सर आईस्टाईन यांनी मर्यादित सापेक्षता सिद्धांत प्रस्तुत केला. या सिद्धांताच्या मते काळ आणि अवकाश अनंत नाही. ती गतीज परिमाणे आहेत आणि त्यांची रचना ठरवण्यास विश्वातील पदार्थ आणि उर्जा कारणीभूत आहेत. म्हणजेच विश्वाच्या सुरुवातीच्या आधीच्या काळाविषयी बोलणे व्यर्थ,निरर्थक आहे. काळ हा विश्वाच्या बरोबरच सुरु झाला आहे, तसेच विश्वाच्या आधीच्या काळाबद्दल बोलणे म्हणजे उत्तर ध्रुवावर जाऊन उत्तर दिशा कोणती असे विचारल्यासारखे आहे. (जो तिथे अस्तित्वात नाही).

विश्वाबाद्द्दल असणाऱ्या सर्व संकल्पनांमध्ये १९२० मध्ये झपाट्याने बदल झाला जेव्हा एडविन हबल यांनी माउंट विल्सन वरून त्यांच्या १०० इंच दुर्बिणीतून अवकाश निरीक्षण सुरु केले.त्यांना असे दिसून आले कि अवकाशात तारे सर्वत्र सारखेच विखुरलेले नाहीत ते एकाच ठिकाणी खूप सार्या प्रमाणात गुच्छ करून आहेत त्यांचा आपण दीर्घिका असे म्हणतो. आपण ज्या दिर्घिकेत राहतो त्याला आपण आकाशगंगा असे म्हणतो.हबल यांनी अशा पुष्कळ दिर्घिकांचा आभ्यास केला. ते दिर्घीकांपासून येणाऱ्या प्रकाशावरून त्यांच्या वेगाचा अंदाज लावू शकले. काळाबरोबर अवकाश बदलत नाही या संकल्पनेला धरून त्यांना से वाटले होते कि जितक्या दीर्घिका आपल्या जवळ येत आहेत तितक्याच दीर्घिका आपल्यापासून दूर जात आहेत. पण आश्चर्य असे कि नंतर हबल यांना निरीक्षणावरून असे समजले कि जवळ जवळ सर्वच दीर्घिका आपल्यापासून दूर जात आहेत इतकेच नाही जितक्या त्या आपल्यापासून दूर आहेत त्या तितक्याच वेगाने आपल्यापासून दूर जात आहेत.  म्हणजेच आवकाश हे काळाबरोबर बदलत नाही अशी जी संकल्पना होती ती फोल ठरली.  विश्व हे काळाबरोबर बदलत आहे, जसजसा काळ जातोय तसतसे विश्व हे प्रसरण पावत आहे असे हबल यांनी सिद्ध केले.

विश्वाचे प्रसारण होत आहे हा २० व्या शतकातला अत्यंत महत्वाचा अविष्कार ठरला. विश्वाला सुरवात असेल या मुद्द्याला या शोधणे आणखी दुजोरा मिळाला.जर दीर्घिका ह्या एकमेकांपासून दूर जात आहेत म्हणजेच भूतकाळात त्या एकमेकांच्या जवळ असण्याची शक्यता वाढली.तसेच जर त्यांचा वेग हा स्थिर असेल तर याचाच अर्थ त्या १५ अब्ज वर्षापूर्वी एकावर एक असल्या पाहिजेत असा अनुमान काढण्यात आला. मग हीच तर विश्वाची सुरवात नसेल ना? बरेच शास्रज्ञ तरीही हे मानण्यास राजी नव्हते कि विश्वाला सुरवात असेल कारण असे झाले तर
भौतीक शास्रातले नियम फोल ठरतील. म्हणून विश्वाचे प्रसारण या सिद्धांताला त्यांनी पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला.

या सिद्धांताला विरोध करणारा एक सिद्धांत बोंडे,गोल्ड आणि होयल यांनी १९४८ मध्ये  मांडला, स्टेडी स्टेट थेरी म्हणजेच विश्वाच्या स्थिर अवस्थेचा सिद्धांत. या सिद्धांतात असे सांगण्यात आले कि दीर्घिका ह्या दूर जात राहतात आणि नवीन दिर्र्घिकांचा जन्म होत राहतो. विश्वात सतत निर्माण होत राहणाऱ्या पदार्थांपासून किवा द्रव्य पासून या दीर्घिका निर्माण होत राहतात. तसेच विश्व हे अनंत आहे आणि ते प्रत्येक वेळेस सारखेच भासते.
परंतु प्रयोगाद्वारे जी निरीक्षणे करण्यात आली ती या सिद्धांताला फोल ठरवत होती.
विश्वाला सुरवात आहे या सिद्धान्ताविरुद्ध अजून एक सिद्धांत मांडला गेला तो असा, विश्वाच्या सुरुवातीला विश्वात अंकुचन होत होते. सर्व दीर्घिका एकमेकांच्या जवळ येत होत्या परंतु पदार्थाच्या परिवलनामुळे आणि त्यामध्ये असणाऱ्या अनियमिततेमुळे ते एका ठिकाणी न  येता एकमेकांना चुकवून दूर गेले (ज्या प्रमाणे दोन्ही हातांची बोटे फैलावून हात एकमेकांवर जोडले कि बोटे एकमेकांच्या मधून निघून जातात).
परंतु स्टीफन हॉकिंग यांनी असे दाखवून देले कि सुरुवातीला विश्व हे बिंदूसमान होते. असा बिंदू जिथे अनंत घनता आणि कालअवकाश वक्रता होती आणि तीच काळाची सुरुवात होती.
या त्यांच्या सिद्धांताला अचूक ठरवण्यासाठी अवकाशातील मायक्रोवेव निरीक्षणे त्यांनी केली. या
मायक्रोवेव आपल्या मायक्रोवेव ओवन मधल्या मायक्रोवेव सारख्याच होत्या परंतु त्यांची उर्जा कमी होती. आपण आजही त्या मायक्रोवेव अनुभवू शकतो. चित्र नसताना टीव्ही वर येणाऱ्या मुंग्या हा त्याच मायक्रोवेव चा प्रताप आहे.
या मायक्रोवेव ची उर्जा प्रचंड होती पण जसजसे विश्व हे वाढत गेले त्यांची ऊर्जाही कमी कमी होत गेली. आणि तेच मायक्रोवेव आपण आज अनुभवतो.
स्टीफन यांचा सिद्धांत विश्वाला सुरुवात आहे हे जरी सांगत असला तरी ती कशी झाली हे सांगू शकत नाही.  आनंत घनतेच्या बिन्दुजवळ सापेक्षता सिद्धांताची गणिते सुद्धा फोल ठरतात म्हणूनच सापेक्षता सिद्धांत विश्वाची सुरवात कशी झाली हे सांगू शकत नाही परंतु त्यानंतर विश्व हे कसे आहे हे सांगण्यास मदत करतो.
म्हणूनच विश्वाला सुरुवात झाली ते खरे पण ती कशी झाली असे विचाराने म्हणजे दक्षिण ध्रुवावर जाऊन दक्षिण दिशा विचारण्यासारखे आहे.




(बाकी नंतर लिहेल आता हात दुखून आलेत)
स्टीफन हॉकिंग यांचा लेखाचा मराठी अनुवाद - सुरज राणे

No comments:

Post a Comment